शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या दिवसात कफ वाढवणारे ५ पदार्थ, खाणं बंद करताच गायब होईल सर्दी खोकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2025 14:50 IST

1 / 7
थंडीच्या दिवसात नाक सारखं वाहतं. सर्दी - खोकला तर असतोच त्यात भर म्हणून कफही होतो. कफ झाला की मात्र हैराण व्हायला होते. पटकन बराही होत नाही आणि कफ झाला की डोकं जड होतं.
2 / 7
आपल्या आहारातील काही पदार्थ कफ वाढवतात. ते पौष्टिक असतात आणि आहारात असायलाच हवेत मात्र थंडीच्या दिवसांत कमी खाल्ले तर घशाची वेगळी काळजी फार घ्यावी लागणार नाही. या पदार्थांचे सेवन कमी करणे फायद्याचे ठरेल.
3 / 7
दही आरोग्यासाठी चांगले असले तरी शरीरातील कफाचे प्रमाण वाढवणारे ठरते. त्यामुळे सर्दीही होते. थंडीच्या दिवसांत दही खाणे शक्यतो टाळावे. दही, ताक याची सवय असली तरी खाऊ नका.
4 / 7
दुग्धजन्य पदार्थ आहारात असतातच. पण हे चीज , क्रिम, पनीर सारखे पदार्थ थंडीत कफ वाढवणारे ठरतात. दुधावर बंदी घालणे शक्य नाही. रोजच्या आहाराचा तो भाग आहे. मात्र त्याचा समावेश जरा कमी करावा.
5 / 7
थंडी म्हणजे मैद्याचे तळलेले कुरकुरीत पदार्थ खाण्याचे दिवस. पण हे पदार्थ खाताना जेवढी मजा येते तेवढीच सजा नंतर भोगावी लागते. त्यामुळे मैदा शक्यतो टाळा. त्यामुळे वजनही वाढते आणि कफही वाढतो.
6 / 7
शेंगदाणे उष्ण असतात. हे जरी खरे असले तर ते कफ आणि पित्त दोन्ही वाढवतात. त्यामुळे पचनाचा त्रास आणि पोटाची अस्वस्थता याचा ही त्रास होतो. त्यामुळे काळजी घ्यावी. शेंगदाणे जरा कमी खावे.
7 / 7
केळं आरोग्यासाठी फार चांगलं असतं. पण केळ्यामुळे सर्दी - खोकला - कफ सारेच वाढते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत केळं जरा कमीच खा. रात्रीच्या वेळ खाणे पूर्णपणे टाळा.
टॅग्स :WinterहिवाळाWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीWinter Foodहिवाळ्यातला आहारHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स