1 / 6लवंग आपल्या घरामध्ये नेहमीच असते. पण खूपच कमी लोक असे आहेत की जे दररोज नियमितपणे लवंग खातात. 2 / 6पण लवंग आरोग्यासाठी अतिशय उत्तम असून दररोज तुम्ही फक्त १ लवंग चावून खाल्ली तरी ते तब्येतीसाठी पुरेसं ठरणारं आहे. लवंग खाल्ल्याने शरीराला नेमके कोणकोणते लाभ मिळतात ते पाहूया..(5 amazing benefits of chewing one clove daily)3 / 6NIH यांच्या रिपोर्टनुसार दातांच्या आरोग्यासाठी लवंग अतिशय उपयुक्त आहे. लवंग खाल्ल्याने दातांसंबंधीचे आजार बऱ्याच प्रमाणात टळू शकतात. तसेच ज्या लोकांना कायम मुखदुर्गंधीचा त्रास असतो, त्यांनाही लवंग खाणे फायद्याचे ठरते.(importance of chewing clove daily)4 / 6लवंगमध्ये असणारे युजेनॉल आणि थायमॉल हे घटक लिव्हर डिटॉक्स करून त्याला अधिक निरोगी करण्याचे काम करतात. त्यामुळे लिव्हरची कार्यक्षमता अधिक वाढते.5 / 6टाईप २ प्रकारचा मधुमेह असणाऱ्यांना दिवसातून २ ते ३ लवंग खाणे फायद्याचे ठरते. कारण लवंग रक्तातील साखर, लिपिड रॅशो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.6 / 6Journal of Trace Elements and Minerals यांच्या अभ्यासानुसार रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही लवंग खाणे उपयुक्त ठरते.