चहा करण्याच्या १० ट्रिक्स; विकतसारखा फक्कड- घट्ट गरमागरम चहा करा घरीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 18:37 IST
1 / 10एका पातेल्यात थोडं पाणी घ्या आणि ते उकळवायला ठेवा. पाणी चांगलं उकळल्यानंतर त्यात दुधाचे प्रमाण पाण्यापेक्षा थोडं जास्त ठेवा. (10 Traditional Ways To Make Amrittulya Tea)2 / 10पाणी आणि दूध एकत्र गरम झाल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार साखर आणि चहा पावडर घाला. (Amrittulya Chai Step By Step Making 10 Tips) 3 / 10या चहाची खरी चव त्याच्या खास चहा मसाल्यांमध्ये असते. हा मसाला तयार करून ठेवून तो उकळत्या चहात घाला.4 / 10चहाला चांगली उकळ येऊ द्या आणि तो सतत चमच्यानं ढवळत राहा यामुळे चहा दाट होतो आणि चव चांगली उतरते.5 / 10चहाचा रंग गडद झाल्यावर आणि तो पुरेसा दाटसर झाल्यावर गॅस बंद करा. चहा गाळून लगेच गरमागरम सर्व्ह करा.6 / 10अमृततुल्य चहा करण्यासाठी अनेक ठिकाणी पितळेचे किंवा जाड बुडाच्या भांड्याचा वापर केला जातो. यामुळे चहाची उष्णता एकसमान टिकून राहते आणि चहा लवकर थंड होत नाही.7 / 10चहा उकळत असताना त्यावर मलाई येऊ दिली जात नाही. साय येऊ नये म्हणून चहा सतत ढवळला जातो. ज्यामुळे तो अधिक कडक आणि दाटसर होतो.8 / 10काही ठिकाणी गुळाचा चहा बनवलो जातो. जो थंडीत पिण्यासाठी पोष्टीक आणि आरोग्यदायी मानला जातो.9 / 10चांगला दाट चहा येण्यासाठी या चहात पाण्यापेक्षा दूधाचे प्रमाण अधिक वापरले जाते. शक्यतो फुल क्रिम किंवा म्हशीच्या दुधाचा वापर केला जातो.10 / 10अमृततुल्यच्या टपऱ्यांवर अनेकदा चहा पुन्हा वापरला जात नाही. ताजा चहा बनवण्यावर भर दिला जातो. ज्यामुळे गुणवत्ता आणि स्वाद टिकून राहतो.