लहान मुलांची खेळणी खरेदी करताय? 'या' गोष्टींकडे लक्ष द्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 16:28 IST
1 / 7लहान मुलांना खेळण्यासाठी बाजारात विविध प्रकारची आकर्षक खेळणी उपलब्ध आहेत. मात्र मुलांसाठी खेळणी खरेदी करताना अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. खेळणी विकत घेताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 2 / 7लहान मुलांना खेळणी प्रचंड आवडतात. मात्र त्यासोबत खेळताना त्यांचा बौद्धिक विकास होणं अत्यंत गरजेचं असतं. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल तसेत त्यांना खेळताना चांगलं शिकायला मिळेल ही गोष्ट लक्षात घेऊन खेळण्यांची खरेदी करा. 3 / 7बाजारात रंगीबेरंगी खेळणी मिळतात. मात्र काही खेळणी मुलांसाठी सुरक्षित नसतात. त्यांना त्यापासून इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना अशी खेळणी देऊ नका तसेच अशा खेळण्यांपासून लांब ठेवा. 4 / 7मुलांसाठी विकत घेतलेली सर्वच खेळणी महाग असली पाहिजेत असं काही नाही. तर त्यांच्या कल्पकतेला वाव मिळेल अशी खेळणी खासकरून विकत घ्या. puzzle game खेळताना मुलांना मदत करा. 5 / 7लहान मुलं हिंसक होतील अशा खेळण्यांपासून त्यांना आवर्जून लांब ठेवा. तसेच मुलांवर नकारात्मक प्रभाव टाकणारी काही खेळणी असतात. खेळणी दिसताना आकर्षक आहेत म्हणून खरेदी करू नका. 6 / 7प्लास्टिकची विविध आकाराची खेळणी आहेत. काही खेळण्यांचा आकार हा लहान असतो. मात्र काही मुलांना ती खेळणी तोंडात घालण्याची सवय असते. त्यामुळे खेळणी खरेदी करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्या. 7 / 7लहान मुलांना स्मार्टफोन आणि व्हिडीओ गेमपासून लांब ठेवा. सततच्या स्मार्टफोनच्या वापरामुळे त्यांच्या डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारची इतर खेळणी द्यावीत.