पठ्ठ्याने एका गुंठ्यात असे घर बांधून दाखविले... येणारे-जाणारेही पाहतच राहिले, जबरदस्त इंटेरिअर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 09:56 IST
1 / 10सरकारी यंत्रणांनी कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी आडवाटा काढून शहरांच्या बाहेर गुंठेवारी आजही सुरु आहे. अनेकांनी मोठमोठ्या इमारतींमझ्ये फ्लॅट न घेता थोड्या बाहेरच्या बाजुला गुंठेवारीची जमीन घेतली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या स्वप्नाचे घर बांधले आहे. 2 / 10स्वप्नातील घर असले तरी ते बांधताना जागेची अडचन असल्याने खूपच कंजेस्टेड बांधले गेलेले असते. यामुळे ना हॉल मिळत, ना किचन, ना बेडरूम अशी अवस्था असते. 3 / 10आमच्या पाहण्यात एक अशाच चिंचोळ्या जागेत बांधलेले अत्यंत सुंदर कल्पकतेने सजविलेले घर आले आहे. 4 / 10शहरात गुंठा घेताना तो चौकोनी तुकडाच मिळेल याची शाश्वती नसते. अनेकदा लांबचेलांग आयताकृती पट्टा असतो. अशा जागेवर या घराचे डिझाईन अत्यंत चपखल बसणारे आहे. 5 / 10हॉल मोठाचे मोठा, त्याला लागूनच मोठे किचन यात आहे. 6 / 10वरती बेडरुमला जाण्यासाठी रुंदीने छोटा का असेना जिना देण्यात आलेला आहे. हा जिना एकाच झटक्यात नाही तर व्ही शेपमध्ये बांधलेला आहे. 7 / 10हॉल खाली जरी असला तरी वरच्या मजल्यावरून थेट सूर्यप्रकाश येण्याची सोय करण्यात आली आहे. 8 / 10आजकालची घरे सूर्यप्रकाशापासून दूर असतात. वास्तूशास्त्रानुसार घरात सूर्यप्रकाश खेळता असायला हवा. अनेकांच्या घरात २४ तास लाईट लाऊन ठेवावी लागते. 9 / 10या घराच्या डिझाईनमध्ये तसे नाहीय. अगदी हॉल, किचनमध्ये देखील सूर्य प्रकाश येण्याची सोय आहे. शिवाय किचनकडे छोटेसे देवघरही आहे. 10 / 10हा १bhk जरी दिसत असला तरी बेडरुमच्या समोर आणखी एक खोली, जसे की स्टडी रुम, लिव्हिंग रूम आहे.