शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - 01 ते 07 मे 2022; आर्थिक आवक, व्यवसायात भरभराट; 'हे' दिवस तुमच्यासाठी असतील खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 09:20 IST

1 / 12
मेष - फायदे होतील : आर्थिक आवक चांगली राहील. एखाद्या मोठ्या व्यवहारात फायदा होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. घरी पाहुणे येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे झाल्यासारखे होईल विविध प्रकारचे तणाव जाणवतील. अकारण मनात धागधूग राहील. काही कारणाने गैरसमज होतील. काळजी वाटत राहील. धार्मिक कार्यात मन रमेल. हातून दानधर्म पूजापाठ घडतील. त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च केला जाईल. व्यवसायात विक्री चांगली राहील. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार चांगले दिवस
2 / 12
वृषभ - भरभराट होईल : व्यवसायात भरभराट होईल. माल हातोहात खपेल. हाती पैसा येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला थोड्या अडचणी येतील. मात्र त्या लवकरच दूर होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. योग्य मार्गदर्शन मिळेल. विविध प्रकारचे लाभ होतील. मात्र देण्या-घेण्याचे व्यवहार जपून करा. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांच्या सहवासात याल. चांगले बोलणे होईल. नोकरीत थोड्या अडचणी येतील. काही सहकारी तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. मात्र संयम सोडू नका. सावधपणे कामे करा. टीप- सोमवार, मंगळवार, गुरुवार चांगले दिवस
3 / 12
मिथुन - चांगली परिस्थिती : काही लोक तुमच्या विरोधात कारवाया करतील. मात्र तुम्हाला त्यातून काही नुकसान होणार नाही. उलट कारवाया करणारे लोकच उघडे पडतील आणि तुमचे पारडे जड होईल. काहींना प्रवास करावा लागेल. मनात आनंदी विचार राहतील. तणाव दूर होतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे मार्गी लागतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील विविध प्रकारचे फायदे होतील उच्च अधिकार मिळतील. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार चांगले दिवस.
4 / 12
कर्क - दगदग होईल : मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. त्यांना चांगल्या संधी मिळाल्याने तुमचा जीव भांड्यात पडेल. नोकरीत दगदग होईल. कामाचे स्वरूप बदलेल. त्यामुळे नवीन कामाशी जुळवून घेताना त्रेधातिरपीट उडू शकते. थोडे शांत चित्ताने कामे करण्याची गरज आहे. घरी पाहुणे येतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी वसूल होण्यात अडचणी येतील. काहींना प्रवास करावा लागेल. खर्च वाढतील. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
5 / 12
सिंह- नोकरीत बदल होईल : कामाचा फार ताण घेऊ नका. घरात ताणतणाव निर्माण होईल. नेमका काय निर्णय घ्यावा याचा अंदाज येणार नाही. एखाद्या हित चितकाचा सल्ला घ्या. जोडीदाराशी मतभेद होतील धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. चांगल्या पुस्तकांचे वाचन करा नोकरीत बदल होतील नोकरीत वाद वाढवू नका. घरी लोकांची ये-जा चालू राहील. जवळच्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. टीप- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
6 / 12
कन्या - आरोग्याची काळजी घ्या : सप्ताहाच्या प्रारंभी तब्येत थोडी नरम गरम राहील. उन्हात जास्त फिरू नका. प्रवास करणे होता होईल तो टाळा. वाहने जपून चालवा. वेगाच्या मर्यादेकडे लक्ष द्या. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. सप्ताहाच्या उत्तरार्धात अनुकूल परिस्थिती राहील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नोकरीत अनुकूल बदल होतील. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील पर्यटनाच्या निमित्ताने आठवड्याच्या शेवटी प्रवास होईल. घरी पाहुणे येतील. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
7 / 12
तूळ - सामान्य परिस्थिती : ग्रहमानाची विशेष साथ मिळणार नाही. त्यामुळे फार मोठ्या कामांना हात घालू नका. अनेक आघाड्यांवर साधक बाधक परिणाम दिसून येतील. आरोग्याची काळजी घ्या. साधा व सात्विक आहार घ्या. दगदग होईल अशी कामे करु नका. उन्हात फिरणे टाळा. कामाच्या व्यापातून आरामासाठी वेळ काढा. जीवनसाथीशी मधुर संभाषण करा. उत्तरार्धात प्रवास होतील. प्रवास कार्य साधक ठरतील, नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. मुलांशी संवाद साधा त्यांच्या अडचणी समजून घ्या. टीप गुरुवार, शनिवार चांगले दिवस
8 / 12
वृश्चिक - शांत चित्ताने कामे करा : सप्ताहाच्या प्रारंभी ग्रहमानाची विशेष साथ मिळेलच असे नाही. प्रवासात दगदग होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीत संघर्ष करावा लागेल. मात्र, शांत चित्ताने कामे केली व बोलण्यावर संयम ठेवला तर परिस्थिती तुमच्या नियंत्रणाखाली राहील, सप्ताहाच्या शेवटी अनुकूलता राहील. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. महत्त्वाची कामे या सप्ताहात पुढे ढकलणे ठिक राहील. कधी कधी संयम बाळगणे आवश्यक असते, हे लक्षात घ्या. टीप सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
9 / 12
धनू - नोकरीत अनुकूल परिस्थिती : सर्वसामान्य परिस्थिती राहील. मुलांच्या बाबतीत काळजी वाटेल. त्यांच्याशी वितंडवाद घालू नका आरोग्याची काळजी घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. कामे आटोक्यात आणण्यासाठी अट्टाहास करू नका, आरामात कामे करा जीवनसाथीच्या कलाने घ्या. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. तसेच वाहनाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष द्या. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे म्हणणे सर्वांना पटेल. टीप- रविवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
10 / 12
मकर- मनाचा मोठेपणा दाखवा : वडिलोपार्जित संपत्तीची कामे करताना अडचणी येतील. वाद, गैरसमज होऊ शकतात. वडीलधाऱ्या मंडळीचे म्हणणे ऐका. भावंडांशी गैरसमज होतील. मात्र, आपण मनाचा मोठेपणा दाखवणे गरजेचे आहे. घरात पाहुणे येतील. थोडी धुसफूस होण्याची शक्यता आहे. आर्थिक उलाढाली जपून करा. हिशोबाच्या बाबतीत बेपवार्ड करू नका. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. तणाव वाढू शकतो. मुले अभ्यासात प्रगती करतील. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
11 / 12
कुंभ - स्पर्धा राहील : आर्थिक बाजू बळकट राहील. खाण्या पिण्याची चंगळ राहील. थोडे तणावाचे वातावरण राहील. मनात काळजीचे विचार राहतील. व्यवसायात स्पर्धा राहील एखादा निर्णय चुकू शकतो. कामाचे नियोजन व्यवस्थित करा. नोकरीत बदल होतील अपेक्षित निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र, संयम सोडू नका. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. मुलांची प्रगती होईल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. टीप- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस
12 / 12
मीन- अनुकूल परिस्थिती : ग्रहमानाची समर्थ साथ राहील. चांगल्या संधी चालून येतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. सोप्या रीतीने कामे मार्गी लागतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. घरी पाहुणे येतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. तुमचा फायदा होईल. व्यवसायात बरकत राहील. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. टीप- सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.
टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष