शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यानंतर आता केंद्रीय पथक दाखल, मदत कधी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 3:42 PM

1 / 12
निसर्ग चक्रीवादळ जाऊन आज 10 दिवस लोटले आहेत. मात्र रायगडवासीयांच्या मनामध्ये अद्यापही वादळाचे माजलेले काहूर शांत झालेले नाही. सरकारच्या मदतीकडे सारे डोळे लावून बसले आहेत.
2 / 12
पंचनाम्याची फुटपट्टी न लावता तातडीने थेट आपादग्रस्तांच्या हातात मदत देण्याची हीच ती वेळ आहे. हे सरकारने आता ध्यानात घ्यावे, अन्यथा रायगडवासी कधीच उभा राहू शकणार नाही.
3 / 12
निसर्ग चक्रीवादळानंतरची जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय भयाण झाली आहे. लाखो नागरिकांच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत, घरांचे छप्पर वादळात उडून गेले आहे. धरणीची उशी आणि आभाळाचे पांघरूण घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.
4 / 12
सरकारने जाहीर केलेली तातडीची मदत जलदगतीने पोहोचणे गरजेचे आहे, मात्र प्रशासनाने नुकसानीचे मोजमाप करण्यासाठी लावलेली पंचनाम्याची फुटपट्टी अद्याप संपलेली नाही.
5 / 12
रायगड जिल्ह्यात 3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे गावोगावी नागरिकांची मालमत्ता, फळबागांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता केंद्र शासनाच्या आंतर मंत्रालयीन पथकाचे रायगड जिल्हयात भेट दिली.
6 / 12
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती केंद्रीय पथकाला संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.
7 / 12
केंद्रीय पथकानेही अलिबाग नागाव चौल येथील नारळ, सुपारी, घरांची, शाळांची झालेली पडझड याची पहाणी करत नुकसानभरपाईचे आश्वासन दिले
8 / 12
अगोदर विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस यांनीही कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती
9 / 12
कोकणावासीयांची भेट घेऊन त्यांना मदतीचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. पण, अद्यापही कोकणवासी मदतीच्या अपेक्षेतच आहेत.
10 / 12
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकणचा दौरा केला, सरकार पूर्णपणे तुमच्या पाठिशी असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं
11 / 12
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आढावा बैठक घेऊन मदतीसाठी १०० कोटींच्या निधीची घोषणाही केली. पण, 100 कोटी रुपयांतील किती रुपये नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचणार हा खरा प्रश्न आहे.
12 / 12
कुणाचं घर या निसर्गाने उद्धवस्त केलंय, तर कुणाची फळबाग नष्ट केलीय. कुणाचा निवारा हिरावून घेतलाय. त्यामुळे कोकणवासी आता सरकारकडेच मदतीच्या आशेन पाहात आहे.
टॅग्स :Raigadरायगडcycloneचक्रीवादळUddhav Thackerayउद्धव ठाकरे