शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 01:29 IST

1 / 7
हुंड्याच्या लालसेने छळणारी सासरची मंडळी. पतीही त्यांचीच री ओढत मारहाण करणारा. सतत मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळ. हे सगळं असह्य झाल्याने वैष्णवी हगवणे या विवाहितेने १६ मे रोजी आयुष्य संपवलं.
2 / 7
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिचा नऊ महिन्यांचा मुलगा आईच्या प्रेमाला पारखा झाला आहे. अतोनात छळाला कंटाळून आयुष्य संपवणाऱ्या वैष्णवीच्या मृत्यूने तिच्या आईवडिलांनाही धक्का बसला. तर तिच्या सासरच्या मंडळींच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
3 / 7
सासरच्या छळामुळे लेकीला गमावलेल्या कस्पटे कुटुंबीयांची म्हणजे वैष्णवीच्या आईवडिलांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री भेट घेतली. या भेटीवेळी एकनाथ शिंदेंनी वैष्णवीच्या बाळाला जवळ घेतलं.
4 / 7
त्यानंतर त्यांनी वैष्णवीच्या आईवडील आणि इतर कुटुंबीयांना धीर दिला. 'हुंड्याच्या मोहापायी मुलीप्रमाणे असलेल्या सुनेला मारहाण करून आत्महत्येचे प्रवृत्त करणाऱ्या हागवणे कुटुंबातील सर्व सदस्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना कठोरात कठोर शासन केले जाईल', अशी ग्वाही शिंदेंनी कस्पटे कुटुंबीयांना दिली.
5 / 7
वैष्णवीच्या आईवडिलांशी बोलताना शिंदे म्हणाले, 'हगवणे यांना मदत करणारे किंवा त्यांच्या आडून समाजात दहशत माजवणारे, अथवा त्यांचे गुन्हे पाठीशी घालण्यासाठी मदत करणारे कितीही मोठे असले तरीही त्यांची गय केली जाणार नाही.'
6 / 7
'वैष्णवीच्या बाळाला हातात घेऊन त्याच्या आईला नक्की न्याय मिळवून देऊ', असा धीर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला.
7 / 7
वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, पती शशांक हगवणे, नणंद करिष्मा हगवणे, सासू यांना अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी हु्ंड्यात दिल्या गेलेल्या काही वस्तूही जप्त केल्या आहेत.
टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेEknath Shindeएकनाथ शिंदेPune Crimeपुणे क्राईम बातम्याdowryहुंडाDomestic Violenceघरगुती हिंसा