शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अहमदपूर हत्याकांड प्रकरणाच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 16:06 IST

1 / 4
बारामती : अहमदपूर (टेंभूर्णी, जि. लातूर) येथे घडलेल्या बलात्कार व हत्याकांड प्रकरणाच्या निषेधार्थ बारामती शहरात गुरूवारी (दि. १५) वडार समाज व समस्त बहूजन समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
2 / 4
या मोर्चाचे नंतर निषेध सभेमध्ये रूपांतर झाले. अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी गावात २८ डिसेंबर २०१७ रोजी १२ शिकणा-या वडार समाजातील मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आली होती.
3 / 4
या घटनेला ५० दिवस उलटले तरी या हत्याकांडातील आपोरींना पकडण्यात अद्याप यश आले नाही. या प्रकरणातील तपासाकामात सबंधीत पोलिस अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.
4 / 4
या मोर्चाला विवध संघटना व राजकिय पक्षांनी पाठींबा दिला. यावेळी मोर्चा दरम्यान महिलांची संख्या लक्षणिय होती. तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टॅग्स :Murderखून