वृत्तपत्र विक्रेता दिन : पहाटे हातात पेपर पडतो, त्यामागील कष्टांची कथा...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:29 IST
1 / 10मध्यरात्रीचे कष्ट... सकाळी उठून, सगळे आवरून, छानपैकी खुर्चीवर बसून पेपर वाचताना त्यामागे मध्यरात्रीचे असे कष्ट असतात.2 / 10पेपर तयार होताना बातमीदार, उपसंपादकांचे कष्ट वेगळेच; पण तयार झालेले पेपर तुमच्या घरापर्यंत आणून देईपर्यंत यामागे एक भलीमोठी यंत्रणा राबत असते.3 / 10विक्रेत्यांचे यश... कोणी सलग तीन पिढ्या हेच काम करणारे, तर कोणी काही वर्षांपूर्वी नव्याने आलेले व आता याच व्यवसायातून कुटुंबाची, मुलांची प्रगती साधलेले. 4 / 10वृत्तपत्रांचा इतिहास दीडशे, दोनशे वर्षांचा. तर यांचा व्यवसायही तेवढाच जुना. आजमितीस पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून ३ हजार विक्रेते आहेत. प्रत्यक्ष लाइन टाकणाऱ्या मुलांची संख्या १३ हजारांपेक्षा जास्त आहे.5 / 10असे होते वितरण.. प्रेसमध्ये पेपरची एकदा छपाई झाली की, मग वितरणाचे काम सुरू होते. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर चौकांत वितरण केंद्र असते. एकट्या पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आता अशी २७ केंद्र आहेत. 6 / 10जिल्हा - तालुका अन् गावनिहाय वेगळीच. प्रेसमधून सर्वांत आधी बाहेर पडतो ग्रामीण अंक, मग उपनगर आणि सर्वांत शेवटी शहराची आवृत्ती.अंक वितरणाचे काम १०० वाहने करतात.7 / 10अविरत कष्ट...पावसात पेपर भिजला की ग्राहक ओरडतात. त्यामुळे ते स्वतः पेक्षाही पेपर भिजू नये म्हणून जास्त काळजी घेतात. पाऊस येतोय म्हणून विक्रेता कुठे थांबलाय, असे होत नाही. 8 / 10थंडीतही कानटोपी घालतो; पण पेपर वेळेवर टाकतोच. पेपर ग्राहकापर्यंत वेळेवर नेऊन देणे त्याच्यासाठी महत्त्वाचे असते. 9 / 10एखादे व्रत करावे तसे हे काम हजारो वृत्तपत्र विक्रेते गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत. 10 / 10कधी पाऊस तर कधी असह्य थंडी.. अशा प्रतिकूल स्थितीतही हातात वृत्तपत्रांचा गठ्ठा घेऊन न थकता घराघरांत पोहचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या या कामाला 'लोकमत'चा सलाम..!