PHOTOS: अखेर मुहूर्त ठरला! केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते होणार चांदणी चौकाचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 15:05 IST
1 / 7भूसंपादनासह अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून चांदणी चौकातील उड्डाणपुलासह रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शनिवारी (दि. १२) केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौकातील मार्गाचे लोकार्पण होणार आहे. 2 / 7यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित राहणार असून, यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.3 / 7यापूर्वी या कामाला १ मे, १५ जुलै असा मुहूर्त मिळाला होता. या चौकातील कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते.4 / 7मात्र, काही काम झाल्यानंतर रस्त्याच्या भूसंपादनासाठी महापालिकेला अनेक अडथळे आले. त्यामुळे हे काम रखडले. त्यानंतर या चौकात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना येथील कोंडीत अडकावे लागले. 5 / 7शिंदे यांनी या कोंडीचा अनुभव घेतल्यानंतर यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले. त्यानंतर भूसंपादनासह या चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याबाबतच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यावर यशस्वीपणे मात करत हे काम पूर्ण झाले.6 / 7पालिकेला भूसंपादनासाठी सुमारे ४०० कोटी तसेच प्रत्यक्षात उड्डाणपूल उभारण्यासह अन्य रस्त्यांची कामे करण्यासाठी ४६० कोटी असे सुमारे ८६० कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी आला आहे. गडकरी यांनी यापूर्वी याचे उद्घाटन १ मे रोजी होईल, असे जाहीर केले होते. मात्र, तो मुहूर्त हुकल्यानंतर १५ जुलै हा दिवस जाहीर केला.7 / 7मात्र काम अपूर्ण असल्याने गडकरी यांनी पुण्यात याबाबत आढावा बैठक घेऊन ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अखेर हे काम अंतिम टप्प्यात आले असून, फलक लावण्याबरोबर रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईची कामे सुरू आहेत. दोन दिवसांत ही कामे पूर्ण करून उद्घाटनानंतर उड्डाणपुलासह सेवा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, असे एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.