शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 11:49 IST

1 / 11
प्रसिद्ध औषध निर्माता कंपनी सीरम इन्स्टीट्यूट मे-जूनमध्ये कोरोनावरील उपचारासाठी एका लसीचे क्लिनिकल ट्रायल आणि उत्पादन एकाचवेळी सुरु करण्याची शक्यता आहे. कंपनी या लसीचे उत्पादन पुण्यातील प्रकल्पामध्ये करण्याची शक्यता आहे.
2 / 11
कंपनीच्या म्हणण्यानुसार देशातील सध्याची परिस्थिती पाहता कोणतीही ट्रायल न घेता लसीचे उत्पादन करण्याची जोखीम घेतली जात आहे. जर ट्रायल यशस्वी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे.
3 / 11
ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने बनविली जाणार आहे. औषध कंपनी सीरमकडे जगातील सर्वाधिक लसी आणि औषधांच्या शोधाचा अनुभव आहे.
4 / 11
कंपनीचे सीईओ अदार पुनावाला यांनी सांगितले की, मेपासून भारतात ट्रायल सुरु होण्याची आशा आहे. भारतात या लसीची किंमत १००० रुपये असू शकते.
5 / 11
या कंपनीला WHO ची मान्यता असून क्लिनिकल ट्रायलनंतर २ ते ४ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. ही कंपनी जगातील सर्वात मोठी औषधे निर्माण करणारी कंपनी आहे.
6 / 11
सीरम इंस्टिट्यूट वर्षाला जवळपास १.५ अब्ज लसींचे उत्पादन करते. तर जगातील १७० देशांमध्ये त्याचा पुरवठा केला जातो. कंपनी अनेक जीव वाचविणारी लस बनविते.
7 / 11
यामध्ये पोलिओ, फ्ल्यू, डीटीपी, आर हिपेटायटीस बी, रुबेला, मम्प्स, टिटनसचेचक अशा आजारांवरील औषधांचा समावेश आहे.
8 / 11
सीरम इंस्टिट्यूट कोरोना व्हायरसच्या लढ्यामध्येही मागे राहिलेली नाही. अमेरिकेच्या कोडाजेनिक्ससोबत मिळून लस तयार करत आहे. तसेच पॅरिस आणि ऑस्ट्रियातील कंपन्यांसोबतही यावर काम करत आहे. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाने या कंपनीसोबत लस उत्पादन करण्यास करार केला आहे.
9 / 11
पुण्यातील या कंपनीने भारताबाहेरही दबदबा निर्माण केला आहे. गेल्या ८ वर्षांत युरोपच्या दोन कंपन्या विकत घेतल्या आहेत.
10 / 11
सायरस पुनावाला यांनी १९६६ मध्ये सीरम इंस्टिट्यूट ची स्थापना केली होती. काही ड़ॉक्टर आणि संशोधकांसोबत काम करत एँटि टिटनस सीरम तयार केले. त्यानंतर या कंपनीने मागे वळून पाहिले नाही. सध्या त्यांचा मुलगा अदार पुनावाला कंपनीचे कामकाज पाहतात.
11 / 11
सायरस पुनावाला हे फोर्ब्सच्या यादीमध्ये १०.४ अब्ज डॉलरच्या संपत्तीमुळे १६१ व्या स्थानी आहेत. त्यांना २००५ मध्ये पद्मश्री पुरस्कारही मिळालेला आहे.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या