धनंजय मुंडे ठरल्याप्रमाणे आजही जनता दरबारात आले, पण...
By मोरेश्वर येरम | Updated: January 14, 2021 18:01 IST
1 / 5राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आज ठरल्याप्रमाणे जनता दरबारात आले. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी संवादही साधला. पण..2 / 5बलात्काराच्या आरोपांमुळे यावेळी जनता दरबारातील वातावरण गंभीर स्वरुपाचं होतं आणि धनंजय मुंडे यांच्या चेहऱ्यावर देखील तणाव दिसत होता. 3 / 5जनता दरबारात धनंजय मुंडे यांच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्टपणे जाणवत होता. ते या तणावातच आपलं कार्यालयीन काम करत होते. 4 / 5धनंजय मुंडे यांनी यावेळी काही कागदपत्रांवर उभं राहूनच स्वाक्षरी केल्याचं पाहायला मिळाल. त्यांच्या या देहबोलीतून त्यांच्यावर तणावाची स्पष्ट जाणीव होत होती.5 / 5धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देणार की शरद पवार यावर निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.