कोरोनाकाळात भाजपा आमदाराचा शाही विवाहसोहळा, अधिकारी वधुसोबत बांधली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 17:12 IST
1 / 7भाजपाचे हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथील आमदार विशाल नैहरिया आणि एचएएस अधिकारी ओशीन शर्मा यांचा शाही विवाहसोहळा सोमवारी संपन्न झाला. सोमवारी संध्याकाळी झालेल्या विवाह सोहळ्यात दोघेही विवाह बंधनात अडकले. 2 / 7गद्दी समुदायाशी संबंधित असलेल्या या वधु-वरांचा विवाहसोहळा गद्दी रीतीरिवाजानुसार पार पडला. 3 / 7विशाल नैहरिया आणि एचएएस अधिकारी ओशीन शर्मा यांनी हा विवाह सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी कांग्रा येथील गोजू बसनूर येथील सर्वात सुंदर मॅरेज पॅलेसची निवड केली होती. 4 / 7मात्र कोरोनाच्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन वधु-वरांकडून मोजक्याच लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विवाह सोहळ्यामध्ये ४०० लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या शाही विवाह सोहळ्यात शासकीय नियमांचेही उल्लंघन झाल्याची चर्चा आहे. 5 / 7आमदार नेहरिया सर्वप्रथम आपल्या बंडी या मूळ गावातून वऱ्हाड घेऊन गोजू मॅरेज पॅलेज येथे आले. तिथे नववधू ओशीन शर्मा या आपल्या कुटुंबीय आणि नातेवाईकांसह उपस्थित होत्या. 6 / 7वऱ्हाड विवाह स्थळाजवळ आल्यावर गद्दी समुदायाशी संबंधित असल्याचे सर्व रीतीरिवाज पार पाडण्यात आले. त्यानंतर विवाह सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीचाही तडका लावण्यात आला. 7 / 7मुख्यमंत्री जयराम ठाकूर या विवाह सोहळ्याला सार्वजनिकरीत्या उपस्थित राहिले नाही. मात्र त्यांनी धर्मशाला येथे येऊत विशाल नेहरिया यांना वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. उत्तीर्ण केली आहे.