By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 13:35 IST
1 / 10महिन्याच्या अखेरिस आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या आसाममध्ये दाखल झाल्या आहेत. 2 / 10त्यांनी चहाच्या मळ्यातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसंच त्यांच्या कामाचं स्वरूपही जाणून घेतलं. त्यांच्या आसाम दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे.3 / 10काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून यासंदर्भातील काही फोटो शेअर केले आहेत. प्रियंका गांधी यांनी आसाममधील सदरू टी एस्टेटमध्ये महिला मजुरांशी संवाद साधला. 4 / 10यानंतर प्रियंका गांधी यांनी चहाच्या पानं खुडत मजुरांशी गप्पाही मारल्या आणि कामाचं स्वरूपही जाणून घेतलं. 5 / 10प्रियंका गांधी या त्या ठिकाणी पारंपारिक वेशभुषेत उपस्थित होत्या. यापूर्वी राहुल गांधी यांनीदेखील आसामचा दौरा केला होता.6 / 10प्रियंका गांधी यांच्या आसाम दौऱ्याचा आज अखेरचा दिवस आहे. यापूर्वी त्यांनी कामाख्या मंदिरात पूजा करून आपल्या दौऱ्याला सुरूवात केली होती. 7 / 10आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.8 / 10२७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल या तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी मतदान होणार असून २ मे रोजी निकाल जाहीर केले जातील.9 / 10सध्या आसाममध्ये एनडीएचं सरकार असून सर्वानंद सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री आहेत.10 / 10गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं ८९ जागांवर निवडणुका लढवल्या होत्या. त्यापैकी ६० जागांवर त्यांना विजय मिळाला होता. तर दुसरीकडे काँग्रेसनं १२२ जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यांना केवळ २६ जागांवर विजय मिळवता आला होता.