कॅन्सरवर मात करून टोकियोत जिंकले पदक; पण ९३ लाखांना केला त्याचा लिलाव, कारण जाणून वाटेल अभिमान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 11:45 AM2021-08-18T11:45:15+5:302021-08-18T11:47:35+5:30

नुकत्याच पार पाडलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पोलंडची भालाफेकपटू मारिया आंद्रेयचक हिनं रौप्यपदकाची कमाई लेकी. पण, Polish javelin thrower Maria Andrejczyk auctions silver medal

नुकत्याच पार पाडलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पोलंडची भालाफेकपटू मारिया आंद्रेयचक हिनं रौप्यपदकाची कमाई लेकी. पण, टोक्योवरून घरी परत येताच तिनं ऑलिम्पिक पदकाचा लिलाव केला. तिचा हा निर्णय अनेकांना आश्चर्यचकीत करणारा होता, परंतु त्यामागचं कारण हे मन जिंकणारं आहे.

मारिया दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाली होती आणि २०१६ मध्ये तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

२०१८मध्या हांडाच्या कॅन्सरमुळे तिला उपचार घ्यावे लागले होते आणि त्यातून बरी होत तिनं टोक्योत ६४.६१ मीटर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले.

मारियानं ८ महिन्यंच्या मिलोश्चक मलीसा याच्यावरील उपचारासाठी पदक लिलाव करण्याचा निर्णय घेतला. या मुलाला एक गंभीर आजार आणि त्याच्यावर अमेरिकेच्या स्टँनफर्ड युनिव्हर्सिटीत उपचार होऊ शकतो. पण, त्यासाठी त्याला भरपूर खर्च येणार आहे.

रिपोर्ट्सनुसार या मुलाला उपचारासाठी २.८६ कोटी रुपयांची गरज आहे आणि त्याच्यासाठी निधी गोळा करण्याची मोहीम सुरू आहे. मारियानं याबाबत तिच्या फेसबूक पोस्टमध्ये इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केलं.

तिच्या या आवाहनाला प्रतिसादही मिळाला. पोलंडमधील सुपरमार्केट चेन चालवणाऱ्या जाबका या कंपनीनं तिचं पदक ९२.९० लाखांत खरेदी केले.

तिनं फेसबूकवर केलेल्या आवाहनांतर १.४३ कोटी रुपयेही जमवण्यात आले. पण, ज्या कंपनीनं सर्वाधिक बोली लावली त्यांनी मारियाला तिचे पदक परत केले अन् रक्कमही त्या मुलाच्या उपचारासाठी दिले.

Read in English