शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 17:19 IST

1 / 10
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा सौदी अरेबियातील क्लब अल नासरसोबतचा करार पुढील दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. तो २०२७ पर्यंत या क्लबसोबत राहील. मोठी गोष्ट म्हणजे रोनाल्डोला पुढील दोन वर्षांत इतके पैसे मिळणार आहेत की त्याची कल्पनाही करणे कठीण आहे. रोनाल्डोला किती पगार मिळेल आणि त्याला किती बोनस मिळेल? चला जाणून घेऊया
2 / 10
क्रिस्टियानो रोनाल्डोचा वार्षिक पगार सुमारे २००० कोटी रुपये (१७८ मिलियन पौंड) असेल. यासोबतच, त्याचा साइनिंग बोनस पहिल्या वर्षी २६४.६ कोटी रुपये (२४.५ मिलियन पौंड) आणि दुसऱ्या वर्षी ४१०.४ कोटी रुपये (३८ मिलियन पौंड) असेल.
3 / 10
सौदी प्रो लीग जिंकल्याबद्दल रोनाल्डोला ८ मिलियन पौंड म्हणजेच ८६.४ कोटी रुपये बोनस मिळेल. याशिवाय, आशियाई चॅम्पियन्स लीग जिंकल्याबद्दल ६.५ मिलियन पौंड म्हणजेच ७०.२ कोटी रुपये बोनस मिळेल.
4 / 10
जर रोनाल्डोने गोल्डन बूट जिंकला तर त्याला ४ मिलियन पौंड म्हणजेच ४३.२ कोटी रुपये मिळतील. एवढेच नाही तर पहिल्या वर्षी केलेल्या प्रत्येक गोलसाठी त्याला ८६.४ लाख रुपये आणि दुसऱ्या वर्षी १ कोटींहून अधिक रुपये मिळतील.
5 / 10
रोनाल्डोने गोल असिस्ट केल्यास त्याला पहिल्या वर्षी ४३.२ लाख रुपये आणि दुसऱ्या वर्षी ५० लाखांहून अधिक रुपये मिळतील. रोनाल्डोला अल नासरमध्ये १५ टक्के हिस्सा मिळेल.
6 / 10
अंदाजानुसार, त्याची रक्कम ३५६.४ कोटी रुपये आहे. इतकेच नाही तर त्याचा स्पॉन्सरशिप करार ६४८ कोटी रुपये असेल. याशिवाय, त्याला खाजगी जेटवर खर्च करण्यासाठी ४३.२ कोटी रुपये देखील मिळतील.
7 / 10
रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यातील बेबनावामुळे ऐन वर्ल्डकप सुरु असतानाच दोघांनी करार संपविला होता. त्यानंतर त्याने सौदी अरेबियाच्या अल नासरसोबत अडीज वर्षांचा करार केला होता. तो अलीकडेच संपल्यानंतर हा करार पुन्हा वाढवण्यात आला.
8 / 10
रोनाल्डोने २००९-१८ पासून स्पॅनिश क्लब रिअल माद्रिदसोबत उत्कृष्ट खेळ केला. या काळात त्याने दोन ला लीगा, दोन स्पॅनिश चषक, चार चॅम्पियन्स लीग विजेतेपद आणि तीन क्लब विश्वचषक जिंकले आहेत.
9 / 10
रोनाल्डोने क्लब आणि देशासाठी एकूण 800 हून अधिक गोल केले आहेत. रोनाल्डोने युव्हेंटसमध्ये तीन वर्षात दोन सेरी ए जेतेपद आणि एक कोपा इटालिया ट्रॉफीही जिंकली.
10 / 10
मेनचेस्टर युनायटेड संघात रोनाल्डोला दरवर्षी जवळपास २६ मिलियन युरो मिळत होते. तर सौदी अरेबियाच्या क्लबनं यापेक्षा पाच पटीनं अधिक मानधन देण्याची तयारी दाखवत २०२२ मध्ये त्याच्याशी करार केला.
टॅग्स :FootballफुटबॉलCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो