शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:50 IST

1 / 8
भारतातील रेल्वे प्रवास हा प्रवाशांसाठी केवळ एक सोयीचा वाहतुकीचा मार्ग नाही, तर हा मालवाहतुकीच्या क्षेत्रातही रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्ही वंदे भारत एक्सप्रेस किंवा राजधानी एक्सप्रेस बद्दल ऐकले असेलच, पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वात लांब ट्रेन कोणती आहे?
2 / 8
भारतातील सर्वात लांब ट्रेनचे नाव 'सुपर वासुकी' आहे, जी वंदे भारत किंवा राजधानी नाही, तर एक विशेष मालगाडी आहे. ही ट्रेन विशेषतः कोळसा वाहून नेण्यासाठी बनवली गेली आहे आणि त्यात एकूण २९५ वॅगन आहेत.
3 / 8
ही ट्रेन तब्बल ६ इंजिनांनी ओढली जाते आणि तिची लांबी सुमारे ३.५ किलोमीटर आहे, ज्यामुळे ती भारतातील आतापर्यंतची सर्वात लांब ट्रेन ठरली आहे.
4 / 8
भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत १५ ऑगस्ट २०२२ रोजी ही ट्रेन सुरू करण्यात आली. देशातील औष्णिक वीज प्रकल्पांना वेळेवर कोळशाचा पुरवठा सुनिश्चित करणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे.
5 / 8
'सुपर वासुकी' ही ट्रेन एका वेळी २७,००० टन कोळसा वाहून नेऊ शकते, जे एका दिवसासाठी ३,००० मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प चालवण्यासाठी पुरेसा आहे.
6 / 8
सुपर वासुकी ही छत्तीसगडमधील कोरबा ते महाराष्ट्रातील राजनांदगावपर्यंत धावते, हा प्रवास सुमारे २६७ किमी आहे. ही ट्रेन सुमारे ११ तास २० मिनिटांत हा प्रवास पूर्ण करते. ही ट्रेन पाच वेगवेगळ्या मालगाड्यांना जोडून बनवली जाते.
7 / 8
या ट्रेनची लांबी इतकी आहे की, जेव्हा ती रेल्वे स्थानकावरून जाते तेव्हा ती सुमारे ४ मिनिटे प्लॅटफॉर्मवर राहते. जर एखाद्या व्यक्तीने ट्रेनच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जाण्याचा प्रयत्न केला तर, त्याला सुमारे १ तास लागेल. त्याची वहन क्षमता सामान्य मालगाडीपेक्षा तिप्पट जास्त आहे.
8 / 8
या गाडीचे 'वासुकी' हे नाव हिंदू पौराणिक कथांवरून आले आहे. वासुकी हा नागराज (सर्पांचा राजा) आणि भगवान शिवाचा भक्त होता. समुद्र मंथनाच्या वेळी त्याचा दोरी म्हणून वापर केला गेला होता. या नावाचा अर्थ संयम, शक्ती आणि विशालता आहे, जे या विशाल रेलगाडीची वैशिष्ट्ये प्रतिबिंबित करते.
टॅग्स :railwayरेल्वेJara hatkeजरा हटके