शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी दुप्पट तयारी, नीति आयोगाचे सदस्य पॉल यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 10:38 PM

1 / 10
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. एकीकडे आता दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता तज्ज्ञांकडून तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
2 / 10
दरम्यान, तिसऱ्या लाटेचा अधिक परिणाम लहान मुलांवर जाणवू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, लहान मुलांचं कोरोनाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी दुपटीपेक्षाही अधिक तयारी करण्यात आल्याचं सांगत सरकारनं आश्वासन दिलं आहे.
3 / 10
लहान मुलांमध्ये सर्वाधिक लक्षणं नसलेल्या केसेस आहेत. तर दुसरीकडे गंभीर केसेस कमी आहेत. कोरोना विषाणूनं आपलं रूप बदललं तर लहान मुलांसाठी धोका वाढू शकतो, असं मत नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के पॉल यांनी व्यक्त केलं.
4 / 10
लहान मुलांच्या रक्षणासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या असतील त्या केल्याच जातील. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. त्यामुळे २ ते ३ टक्के मुलांनाच रुग्णालयाची गरज भासते, असंही ते म्हणाले.
5 / 10
लहान मुलांमध्ये कोरोनाची दोन रुपं दिसतात. एकामध्ये ताप, खोकला आणि निमोनिया आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल करणं. दुसऱ्या रूपात २ ते ६ आठवड्यांमध्ये रिकव्हरीनंतर मुलांमध्ये पुन्हा ताप, रॅशेस, डायरिया, श्वसनाचा त्रास, रक्तस्राव अशा तक्रारी येत असल्याचं पॉल म्हणाले.
6 / 10
भारतात कोविशिल्ड या लसीचे दोनच डोस देण्यात येणार आहेत. यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. कोरोनाच्या लसी एकत्र करून नवा डोस तयार करण्यावर आणि त्याच्या प्रभावावरही पॉल यांनी भाष्य केलं.
7 / 10
'हा वैज्ञानिक मुद्दा आहे आणि आता विज्ञानच त्याकडे पाहिल. तोपर्यंत कोणतेही डोस एकत्र केले जाणार नाही. ज्यावेळी काही बदल केले जातील त्यावेळी त्याची माहिती देण्यात येईल,' असंही पॉल यांनी स्पष्ट केलं.
8 / 10
७ मे रोजी देशात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. आता कोरोनाच्या प्रकरणांमध्ये ६९ टक्क्यांची घट पाहायला मिळत आहे. ४३ दिवसांमध्ये आता कोरोनाच्या केसेसमध्ये घट होत असल्याची माहिती आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी दिली.
9 / 10
राज्यांमधील अॅक्टिव्ह केसेसही आठवड्याभरापासून कमी होताना दिसत आहेत. एक अशी वेळ होती जेव्हा पॉझिटिव्हीटी रेट २१.३८ टक्क्यांवर पोहोचला होता. तो आता ६.६२ टक्क्यांवर आला आहे, असंही ते म्हणाले.
10 / 10
दरम्यान, वाढलेल्या चाचण्या आणि कंटेन्मेंट झोनमुळे कोरोनाच्या केसेसमध्ये घट झाल्याचं आयसीएमआरचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव म्हणाले. तसंच जुलै महिन्यापर्यंत दररोज १ कोटी लोकांचं लसीकरणही केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतNIti Ayogनिती आयोग