शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

का चर्चेत आलाय समुद्राकडेचा ऋषिकोंडाचा शीषमहल; अस्सल सोन्याचा वापर, इटालियन मार्बल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:43 IST

1 / 6
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सत्ताकाळात ऋषिकोंडा टेकडीत मोठमोठे अलिशान बंगले उभे राहिले होते. ते रेड्डी यांचे कार्यालय आणि निवासस्थान बनले होते. आता ही जागा चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. हा शीषमहल अनेकांच्या डोळ्यात भरणारा, डोळे दिपवणारा असाच होता.
2 / 6
या सर्व मालमत्तेची किंमत ५०० कोटी रुपये सांगितली जात आहे. पर्यावरणाचे उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. येथील बंगल्यांमध्ये सोन्याची सजावट, इटालियन मार्बल आणि आलिशान महागड्या वस्तू वापरण्यात आल्या आहेत.
3 / 6
ही मालमत्ता ऋषिकोंडाच्या १० एकर जागेत बांधण्यात आला आहे. चार मोठ्या आकाराचे बंगले ज्यापैकी एक भाग हा समुद्र किनाऱ्याला लागून आहे. या जमिनीमध्ये पक्के रस्ते, शहरालाही लाजवेल असे पाणी बाहेर जाण्याची गटारे तसेच १०० किलो वॅट एवढा वीज पुरवठा करणारे सबस्टेशन आदी गोष्टी आहेत.
4 / 6
या बंगल्यांच्या बांधकामासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) नियमांचे उघड उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. ऋषिकोंडाची टेकडी कापण्यात आली आहे. जवळपास अर्धा भाग कापून त्या जागेवर ही मालमत्ता उभारण्यात आली आहे.
5 / 6
केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने (MoEF) १९ मे २०२१ रोजी याला पर्यटन विकास प्रकल्प म्हणून मान्यता दिली होती. परंतू, रेड्डी सरकारने जगन मोहन रेड्डी यांच्या वैयक्तिक वापरासाठी याचे बांधकाम केल्याचा आरोप आताचे सरकार करत आहे.
6 / 6
मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या प्रशासनाने जगन मोहन रेड्डी यांच्यावर सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. हा खर्च ६०० कोटींपेक्षाही जास्त असू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. एकंदरीतच रेड्डी यांच्या या अतिविलासी राहण्याला सत्ताधारी कात्रीत पकडत आहेत.
टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश