शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताचे पुढील राष्ट्रपती कोण? उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंसह या बड्या नेत्यांची नावं आघाडीवर, संघ-भाजपामध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 6:57 PM

1 / 7
२०२२ हे वर्ष देशात अनेक राजकीय घडामोडींमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. त्यातच संपूर्ण देशाचे यावर्षी ज्या राजकीय घटनेकडे सर्वाधिक लक्ष असेल ती गोष्ट म्हणजे यावर्षी होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होय. देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २५ जुलै रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे पुढील राष्ट्रपती कोण असतील याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
2 / 7
दरम्यान, केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपाकडे भक्कम बहुमत तसेच विविध प्रमुख राज्यांमध्ये सत्ता असल्याने राष्ट्रपतीपदासाठी भाजपाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराचे पारडे जड राहण्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून राष्ट्रपतीपदासाठी चार नेत्यांची नावं आघाडीवर आहेत.
3 / 7
भाजपाकडून राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असलेल्या नेत्यांमध्ये थावरचंद गहलोत, आरिफ मोहम्मद खान, आनंदीबेन पटेल आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा समावेश आहे. त्यांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहेत.
4 / 7
थावरचंद गहलोह हे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. सध्या ते कर्नाटकचे राज्यपालपदी नियुक्त आहेत. तत्पूर्वी ते केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम पाहत होते. तसेच त्यांनी भाजपाच्या संसदीय बोर्ड आणि केंद्रीय निवडणूक समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहिले होते. आता जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपा त्यांना उमेदवारी देऊ शकतो.
5 / 7
सध्या केरळचे राज्यपाल असलेले आरिफ मोहम्मद खान हे उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमधील रहिवासी आहेत. शाहबानो खटल्यानंतर त्यांनी राजीव गांधी सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ट्रिपल तलाक, सीएए आंदोलनावेळी त्यांची भूमिका भाजपासाठी मदतगार ठरली होती. त्यांना राष्ट्रपती बनवून भाजपा आणि संघ आपण मुस्लिमविरोधी नाही, असा संदेश जगभरात देऊ शकते.
6 / 7
आनंदीबेन पटेल ह्या गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांची सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना राष्ट्रपतीपदासाठी संधी देऊन भाजपा २०२४ च्या निवडणुकीपूर्वी महिलांना मोठा संदेश देऊ शकते. पण आनंदीबेन पटेल यांचं सध्याचं वय ८० वर्षे आहे. ही बाबत त्यांच्यासाठी नकारात्मक ठरू शकते.
7 / 7
व्यंकय्या नायडू हे सध्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत. उपराष्ट्रपती नियुक्ती होण्यापूर्वी ते केंद्रीय मंत्री होते. तसेच त्यांनी दीर्घकाळ भाजपामध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. ते मुळचे आंध्र प्रदेशमधील असून, त्यांनी २००२ ते २००४ या काळात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. २०१७ मध्ये त्यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाली होती. त्यांना राष्ट्रपतीपदासाठी संधी देऊन भाजपा दक्षिण भारतामध्ये आपला पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने राजकीय संदेश देऊ शकते.
टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षIndiaभारतElectionनिवडणूक