श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब; तीन वर्गात विभागलीय देशाची लोकसंख्या, तुम्ही कुठल्या वर्गात? पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:01 IST
1 / 5एकेकाळी खूप गरिबी असलेल्या आपल्या देशात नव्वदच्या दशकानंतर मध्यमवर्गीयांचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थिती एकीकडे अतिश्रीमंत आणि दुसरीकडे गरीब वर्ग यांच्यामध्ये असलेल्या मध्यमवर्गीय समाजाचं स्थान महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्यामुळे अर्थसंकल्प जवळ आला की सर्वांच्या नजरा या मध्यमवर्गीयांकडे वळतात. 2 / 5अर्थसंकल्प येताच त्यामधून मध्यमवर्गीयांना सर्वाधिक अपेक्षा असतात. प्राप्तिकरापासून ते जीएसटीपर्यंत अनेक बाबतीत दिलासा मिळेल, असे मध्यमवर्गीयांना वाटत असते. मागच्या दशकभरापासून देशामध्ये सर्वाधिक आर्थिक भार हा मध्यमवर्गीयांवर पडत असल्याचे सांगितले जाते. या वर्गाचं उत्पन्न घटत असून, खर्च वाढत आहेत, एवढंच नाही तर कराचा बोजाही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आपण आपल्या देशात श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब अशी वर्गवारी ढोबळमानाने कशी केली जाते, याचा आढावा घेऊयात. 3 / 5गोल्डमॅन सॅक्सच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये सुमारे १० कोटी लोक हे उच्चवर्गीय म्हणजेच श्रीमंत श्रेणीमध्ये येतात. २०२४ या वर्षासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला होता. काही संस्था आणि तज्ज्ञ १२ कोटी लोकांचा या श्रीमंत वर्गात समावेश करतात. अहवालानुसार भारतामध्ये दरवर्षी १० हजार डॉलरहून अधिक कमाई असणाऱ्यांचा श्रीमंत वर्गात समावेश होतो. इतर अहवालांनुसार वार्षिक ९ ते १२ लाख रुपये कमाई असलेल्यांचा समावेश हा श्रीमंत वर्गामध्ये होतो. 4 / 5सर्वसाधारणपणे ३ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींचा समावेश हा मध्यमवर्गीयांमध्ये होतो. एका निकषानुसार ज्या व्यक्तींचं वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपये असतं, त्यांचा समावेश मध्यमवर्गीयांमध्ये केला जातो. म्हणजेच एका कुटुंबामध्ये चार सदस्य असतील आणि संपूर्ण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न सुमारे १० लाख रुपये असेल, तर त्या कुटुंबाचा समावेश मध्यमवर्गीयांमध्ये होतो. दरम्यान, काही वर्षांपूर्वी इंडियन थिंक टँकच्या एका सर्व्हेमध्ये सांगिलत्यानुसार ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ५ लाखांपासून ३० लाख रुपयांपर्यंत असतं, त्यांचा समावेश हा मध्यमवर्गीयांमध्ये होतो. 5 / 5आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीयांपेक्षा खालील वर्गात असणाऱ्या लोकांचा समावेश हा कनिष्ठ वर्ग किंवा गरीबांमध्ये होतो. म्हणजेच ज्यांचं उत्पन्न हे ३ लाख रुपयांहून कमी असते, त्या सर्वांचा समावेश हा कनिष्ठ वर्गामध्ये होतो. तसेच देशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही याच वर्गातील आहे. एका अंदाजानुसार देशामध्ये किमान ८० कोटी लोक हे या वर्गातील आहेत.