पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 11:29 IST
1 / 7काश्मीर खोऱ्यातील बैसरन पठारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मुसा असल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २६ पर्यटकांच्या हत्येचा कटाचा हाशिम मुसाच म्होरक्या आहे. त्याचं पाकिस्तान कनेक्शनही आता समोर आले आहे. 2 / 7हाशिम मुसाबद्दल जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार तो पाकिस्तानच्या लष्करात जवान राहिलेला आहे. त्यानंतर त्याने काश्मीरमधील कठुआ आणि सांबा सेक्टरमधून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती.3 / 7भारतात आल्यानंतर हाशिम मुसा सर्वात आधी राजौरी-पुंछमधील डेरा परिसरात सक्रिय झाला होता. लश्कर ए तोयबाचा दहशतवादी असलेल्या हाशिम मुसाने गेल्या काही वर्षात अनेकदा लष्कराच्या जवानांवरही हल्ले करण्याचे कटही रचल्याचाही सुरक्षा यंत्रणांना संशय आहे.4 / 7हाशिम मुसाने पाकिस्तानी लष्करामध्ये निम लष्करी जवान, विशेष सेवा गटाकडून दिले जाणारे प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणात युद्ध, रणनीती आणि पर्वतीय प्रदेशामधील युद्धाचा समावेश असतो.5 / 7पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, त्यातून हेही समोर आले आहे की, दहशतवाद्यांनी पोलीस आणि लष्कराची गस्त असताना ते चकमा देऊन आले. डोंगर, पठार असलेल्या मार्गांचा वापर केल्याने त्यांना लष्करी प्रशिक्षण मिळालेले आहे.6 / 7हाशिम मुसाने लष्करी प्रशिक्षण घेतले असल्याचा आणखी एक पुरावा म्हणजे त्यांनी हल्ल्यात एम४ कार्बाईनसह अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला आहे. ही शस्त्र जवळ बाळगायची असेल आणि चालवायची असेल, तर विशेष प्रशिक्षणाचीच गरज असते.7 / 7सध्या एनआयए आणि इतर गुप्तचर यंत्रणा या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. त्यांचे पाकिस्तानातील लश्कर ए तोयबा सोबतचे संबंध समोर आले असले, तरी त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. हाशिम मुसा आणि इतर दोघे अशा तिन्ही दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला ६० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.