कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:59 IST
1 / 10लंडनच्या स्कूल ऑफ ऑरिएंटल अँन्ड आफ्रिकन स्टडीजमध्ये हिंदीच्या प्रसिद्ध स्कॉलर आणि प्रोफेसर असलेल्या फ्रांसेस्का ऑर्सिनी यांना सोमवारी रात्री भारतात येण्यापासून रोखले आहे. त्यांच्याकडे ५ वर्षाचा ई व्हिसा असतानाही दिल्ली विमानतळावर त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना आहे.2 / 10फ्रांसेस्का ऑर्सिनी चीनमधील एका संमेलनात भाग घेतल्यानंतर हाँगकाँगमार्गे दिल्ली पोहचल्या होत्या. मात्र दिल्ली विमानतळावर भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेश नाकारला. त्यांचा प्रवेश का रोखण्यात आला याबाबत माहिती नाही. ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.3 / 10या घटनेवरून विरोधकांनी केंद्र सरकारला टार्गेट केले आहे. अखेर फ्रांसेस्का ऑर्सिनी कोण आहेत आणि त्यांच्या भारतातील नो एन्ट्रीवरून इतकी चर्चा का होतेय याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. 4 / 10फ्रांसेस्का ऑर्सिनी यांनी इटलीतील वेनिस यूनिवर्सिटीतून हिंदीतून पदवीचं शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी भारतात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हिंदी आणि जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटीतून पुढील शिक्षण घेतले. मग लंडन येथील SOAS मधून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. 5 / 10ऑर्सिनीसाठी भारत हे केवळ अभ्यासाचा विषय नाही तर त्यांच्यासाठी प्रत्यक्ष अभ्यास व भेटीचे ठिकाण देखील आहे. त्यांनी हिंदी आणि दक्षिण आशियाई भाषांमध्ये अभ्यास केला आहे व भारतातील हिंदीच्या माध्यमातून सांस्कृतिक-शास्त्रीय संवाद वाढविला आहे.6 / 10त्या हिंदी आणि उर्दू साहित्याच्या १९व्या आणि २०व्या शतकातील अभ्यासासाठी ओळखल्या जातात. ज्यात 'द हिंदी पब्लिक स्फियर १९२०-१९४०' सारखी पुस्तके समाविष्ट आहेत. त्यांचे संशोधन भारतीय राष्ट्रवाद आणि बहुभाषिकतेवर केंद्रित आहे, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय सन्मानही मिळाले आहेत.7 / 10ऑर्सिनी अनेकदा भारतात येत असतात. विविध संशोधन, परिषदांमध्ये त्या सहभागी होतात. अलीकडेच ऑक्टोबर २०२४ मध्ये त्या भारतात आल्या होत्या. भारतीय भाषा आणि साहित्याच्या अभ्यासक म्हणून भारतातील अनेक विद्वानांमध्येही त्या परिचित आहेत. 8 / 10त्यांच्या प्रकाशित ग्रंथांमध्ये 'ईस्ट ऑफ दिल्ली: मल्टीलिंग्युअल लिटरेरी कल्चर अँड वर्ल्ड लिटरेचर', 'प्रिंट अँड प्लेजर: पॉप्युलर लिटरेचर अँड एंटरटेनिंग फिक्शन्स इन कॉलोनियल नॉर्थ इंडिया' आणि 'द हिंदी पब्लिक स्फेअर १९२०-१९४०: लँग्वेज अँड लिटरेचर इन द एज ऑफ नॅशनॅलिझम' यांचा समावेश आहे. 9 / 10सध्या त्या SOAS च्या भाषा, संस्कृती आणि भाषाशास्त्र शाळेत हिंदी आणि दक्षिण आशियाई साहित्याच्या प्राध्यापक एमेरिटा म्हणून काम करतात. त्या पूर्वी केंब्रिज विद्यापीठात अध्यापन करत होत्या. २०१७ मध्ये त्यांना ब्रिटिश अकादमीचे फेलो म्हणून निवडण्यात आले, जे मानविकी आणि सामाजिक शास्त्रांमध्ये उत्कृष्टतेचे प्रतीक आहे.10 / 10टीएमसी खासदार सागरिका घोष यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, 'धक्कादायक आणि दुःखद. दक्षिण आशियाई साहित्य आणि हिंदीच्या जगप्रसिद्ध अभ्यासक फ्रांसेस्का ऑर्सिनी यांना वैध व्हिसा असूनही भारतातून हद्दपार केले. संकुचित आणि मागास विचारसरणीचे नरेंद्र मोदी सरकार खुल्या मनाच्या शिष्यवृत्ती आणि उत्कृष्टतेचा नाश करत आहे, जी भारताची ओळख आहे असं त्यांनी म्हटलं.