1 / 8ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय सैन्याने दिलेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. यामध्ये एका अधिकाऱ्याचे नाव सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या महिला अधिकाऱ्याचे नाव व्योमिका सिंग आहे. सोफिया कुरेशी या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल आहेत. तर व्योमिका सिंग या भारतीय हवाई दलात विंग कमांडर आहेत.2 / 8सोफिया कुरेशी मूळच्या गुजरातच्या आहेत. त्यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सोफिया यांचे आजोबा देखील सैन्यात होते आणि त्यांच्या वडिलांनीही काही वर्षे सैन्यात धार्मिक शिक्षक म्हणून काम केले होते. 3 / 8सोफिया कुरेशी यांचा विवाह मेकॅनाइज्ड इन्फंट्रीचे लष्करी अधिकारी मेजर ताजुद्दीन कुरेशी यांच्याशी झाला आहे आणि त्यांना समीर कुरेशी हा मुलगा आहे. सोफिया कुरेशी या १९९९ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाल्या होत्या. त्यांनी १९९९ मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सोफिया यांना सैन्यात लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळाले. 4 / 8२००६ मध्ये, सोफिया यांनी काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले आहे. २०१० पासून त्या शांतता मोहिमेशी संबंधित आहेत.5 / 8पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांच्या सेवेबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) कडून प्रशंसापत्र देखील मिळाले आहे. ईशान्य भारतातील पूर मदत कार्यादरम्यान त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल सोफिया यांना सिग्नल ऑफिसर इन चीफ (एसओ-इन-सी) कडून प्रशंसापत्र देखील मिळाले.6 / 8ऑपरेशन सिंदूरवर विंग कमांडर व्योमिका सिंग यांनीही ब्रीफिंग दिले. विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा हवाई दलातील प्रवास एका स्वप्नाने सुरू झाला.त्यांचे शाळेपासूनच विमान उडवण्याचे स्वप्न होते. त्यांनी नॅशनल कॅडेट कॉर्प्समध्ये सामील होऊन आपले ध्येय गाठले आणि नंतर त्याचे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.7 / 8व्योमिका सिंग या त्यांच्या कुटुंबातील पहिल्याच अशा आहेत ज्या सशस्त्र दलात सामील झाल्या आहेत. त्यांना भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले. १८ डिसेंबर २०१९ रोजी त्यांना फ्लाइंग ब्रांचमध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळाले. 8 / 8व्योमिका सिंग या त्यांच्या कुटुंबातील पहिल्याच अशा आहेत ज्या सशस्त्र दलात सामील झाल्या आहेत. त्यांना भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले. १८ डिसेंबर २०१९ रोजी त्यांना फ्लाइंग ब्रांचमध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळाले.