1 / 8नुकत्याच गो इंडिगोच्या विमानाचा एअर टर्ब्युलन्सचा व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहे. हे सर्व धडकी भरविणारे आहे. विमानाच्या पुढच्या भागाला मोठे भोक पडले आहे. आकाशात एवढे काय होते की विमानात अशी परिस्थिती उद्भवते. विमानावर वीज पडली तर काय होते, असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. 2 / 8पाऊस आणि धुके हे विमानांसाठी त्रासदायक मानले जाते. विमानांवर वीज कोसळण्याचे प्रमाण खूप जास्त असते. परंतू, एक गोष्ट या विमानांना वीज पडल्यावर वाचविते. यामुळे वीज पडली तरी विमानांचे अपघात होत नाहीत. 3 / 8दर १००० ट्रीपमध्ये एकदा वीज पडण्याचा प्रकार होत असतो. काहीवेळा विमानेच या भारलेल्या ढगांच्या बाजुने गेल्यावर वीज चमकण्याचे कारण बनतात. यामुळे अनेकदा विमानापासूनच चकाकण्यास सुरुवात होते आणि इतर दिशांना जाते. 4 / 8या वीजेपासून विमानाला नुकसान होऊ नये किंवा आतील प्रवाशांना धोका निर्माण होऊ नये म्हणून बाहेरच तिला थोपविले जाते. यासाठी विमानाच्या अॅल्युमिनिअम बॉडीवर एक विशेष आवरण लावलेले असते. 5 / 8हे आवरण वीज पडली की ती एका बाजुने पुढे परावर्तीत करते आणि दुसऱ्या बाजुला पाठविते. यामुळे फक्त आतमध्ये हादरे जाणवतात. वीज पडून हानी होत नाही. 6 / 8तुम्ही घरात पाहता, वीज चमकली की घरातील विद्युत उपकरणे खराब होतात. परंतू विमानात सहसा तसे होत नाही, याला कारण हे बाहेरील आवरण असते. 7 / 8ही विद्युत उपकरणे, फ्युअल टँक अशाप्रकारे बनविले जातात की त्यांच्यावर वीज पडल्याचा काहीच प्रभाव पडत नाही. ही वीज विमानात जाऊ नये म्हणून ती काही उपकरणे बसवलेली असतात जी ती वीज साठवतात आणि पुन्हा बाहेर हवेत सोडतात. 8 / 8 विमानाच्या बाहेर जे आवरण असते त्याला 'कंडक्टिव कोटिंग' असे म्हणतात. यामुळे आतील प्रवाशांना शॉक बसत नाही. विमानाच्या पंखांवर, शेपटीवर आणि नाकावर बसवलेले 'स्टॅटिक डिस्चार्जर्स' वीज सुरक्षितपणे बाहेर टाकतात.