By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:01 IST
1 / 9युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या पत्नी आणि युक्रेनच्या पहिल्या महिला ओलेना झेलेन्स्का एका विशेष विमानाने जपानला जात होत्या. पण, अचानक त्यांचे विमान भारतातील जयपूर विमानतळावर उतरले.2 / 9ओलेना झेलेन्स्का यांचे विमान जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अचानक उतरले. अचानक हे विमान उतरल्यानंतर चर्चेचा विषय ठरला.3 / 9हे विमान इंधन भरण्यासाठी काही काळ थांबले होते. या प्रवासात युक्रेनचे अनेक उच्च अधिकारीही त्यांच्यासोबत होते. भारत सरकारने या संपूर्ण कार्यक्रमासाठी आधीच परवानगी दिली होती. एका विशेष प्रोटोकॉल अंतर्गत व्यवस्था देखील करण्यात आली होती.4 / 9हे व्हीआयपी विमान सकाळी ६.३० वाजता जयपूरमध्ये उतरले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने १ ऑगस्ट रोजी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोला युक्रेनियन शिष्टमंडळाचा सन्मान करण्याचे आणि त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्याचे निर्देश आधीच दिले होते.5 / 9विमानात २३ उच्चस्तरीय अधिकारी होते, यामध्ये युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आंद्री त्सिबिहा, युक्रेनचे संयुक्त राष्ट्रांमधील स्थायी प्रतिनिधी सर्गेई किस्लिट्स्या आणि आर्थिक व्यवहार मंत्री ओलेक्सी सोबोलेव्ह यांचा समावेश होता.6 / 9जयपूरमध्ये त्यांचे विमान उतरताच, सर्व पाहुण्यांना व्हीआयपी लाउंजमध्ये नेण्यात आले, तिथे त्यांना नाश्ता देण्यात आला. यादरम्यान, दिल्लीतील युक्रेनियन दूतावासातील अधिकारीही जयपूरला पोहोचले होते,यावेळी त्यांनी त्यांची भेट घेतली.7 / 9युक्रेनियन शिष्टमंडळाला इमिग्रेशन तपासणीतून सूट देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना तपासणीतून जावे लागले नाही किंवा कोणत्याही औपचारिकता पूर्ण कराव्या लागल्या नाहीत. रात्री ८.१५ वाजता विमानाने पुन्हा उड्डाण केले ते सर्वजण जपानला रवाना झाले.8 / 9भारत आणि युक्रेनचे १९९१ पासून चांगले संबंध आहेत. युक्रेनच्या स्वातंत्र्याला मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत हा होता.9 / 9जानेवारी १९९२ मध्ये दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. व्यापार, शिक्षण, संरक्षण आणि विज्ञान अशा अनेक क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य आहे.