शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:51 IST

1 / 10
पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा फिस्कटल्यानंतर भारत अलर्ट मोडवर आला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या १८ जहाजांना सुरक्षित आणण्यासाठी भारताने एक मोहीम सुरू केली आहे. या जहाजांवरील माल भारतात आणायचा आहे. भारताच्या या स्पेशल ऑपरेशनचा उद्देश ऊर्जा सुरक्षा पुन्हा पूर्ववत करणे आणि भारतीय बंदरांवर साठलेला माल मोकळा करणे हा आहे.
2 / 10
मध्य पूर्वेत पुन्हा युद्ध सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर तेल टँकर, एलपीजी आणि एलएनजीने भरलेली जहाजे सुरक्षितपणे परत यावीत यासाठी भारत सरकारने स्पेशल ऑपरेशन लॉन्च केले आहे. इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे भारतीय बंदरांवर गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत.
3 / 10
होर्मुझहून येणारी जहाजे काय घेऊन येत आहेत? - १८ जहाजांपैकी चार जहाजे एलपीजी घेऊन जात आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तीन एलएनजी जहाजे अडकली आहेत. ११ कच्चे तेल वाहून नेणारे टँकर आहेत. पाच जहाजे भारतीय ध्वजाखाली कार्यरत आहेत. उर्वरित जहाजे भारतीय कंपन्यांनी भाडेतत्त्वावर घेतली आहेत.
4 / 10
होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला भारताशी संबंधित १५ जहाजे आहेत. ओमानच्या आखातात आणि एडनच्या आखातात प्रत्येकी तीन जहाजे आहेत. सध्या दोन भारतीय जहाजे लाल समुद्रात आहेत. या जहाजांना प्राधान्याने उतरवण्याची जागा देण्याचे निर्देश बंदरांना देण्यात आले आहेत.
5 / 10
मिळालेल्या माहितीनुसार 'ग्रीन आशा' या एलपीजी जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली असून ते मुंबईतील जेएनपीटीच्या दिशेने जात आहे. भारताच्या या स्पेशल ऑपरेशनद्वारे ज्या बंदरांवर अंदाजे १०६,८९० टीईयू क्षमतेचे कंटेनर आणि मोठ्या प्रमाणात नाशवंत माल अडकून पडला आहे त्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
6 / 10
या संघर्षामुळे परिस्थिती सामान्य होईपर्यंत बंदर व्यवस्थापकांना आखाती देशांकडे होणारी मालवाहतूक थांबवण्यास भाग पडले आहे. बंदर व्यवस्थापकांनी शिपिंग कंपन्यांना डेमरेज आणि डॉकिंग शुल्क कमी करण्यासाठी डॉकिंग शुल्कात सवलत देण्याची विनंती केली आहे.
7 / 10
पर्शियन आखात आणि आसपासच्या परिसरात केवळ जहाजेच अडकली नाहीत तर २०,००० भारतीय खलाशीही अडकले आहेत. यांपैकी किमान ४७५ खलाशी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवर कार्यरत आहेत.
8 / 10
आतापर्यंत सरकारने १,७५४ खलाशांना बाहेर काढले असून उर्वरित खलाशांना सुरक्षितपणे वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आयएमओने ध्वजधारक देश आणि किनारपट्टीवरील देशांना युद्धविराम कराराचा उपयोग करून खलाशांना बाहेर काढण्यासाठी इव्हॅक्युएशन कॉरिडॉर्स कराव्यात आणि बाधित झालेले सागरी मार्ग मोकळे करावेत असं आवाहन केले आहे.
9 / 10
अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला आहे. मात्र पाकिस्तानमधील शांतता चर्चा फिस्कटल्याने अद्यापही होर्मूझच्या समुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यात भारताने या सागरी मार्गावरून जहाजांच्या स्वतंत्र आणि सुरक्षित वाहतुकीची भूमिका घेतली आहे.
10 / 10
होर्मुझमधून वाहतूक करणाऱ्या जहाजांवर इराणने टोल आकारणी सुरू केली आहे. इराणने भारताला 'मित्र देश' म्हणून या मार्गावरून प्रवासाची परवानगी दिली आहे. परंतु पैसे देण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. या मार्गावरून आतापर्यंत भारताचे ८ एलपीजी टँकर्स सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत. हा मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIndiaभारतIranइराणAmericaअमेरिकाWarयुद्ध