शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रेस्टॉरंटच्या ५ मस्त ट्रिक्स समजून घ्या, मग बाहेर खायला गेल्यावर तुमचे खूप पैसे वाचतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 11:04 AM

1 / 8
रोजचं घरचं जेवण करुन कंटाळा आला किंवा एखादं सेलिब्रेशन असलं की बाहेरचं खाण्याचा बेत आपण आखतो. आता तर थेट घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनं जेवण ऑर्डर करता येतं. तरीही काहीवेळा आपल्याला बाहेर जेवायला जावसं वाटतं.
2 / 8
हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये आपण जेवायला गेलो की आपल्याला आवडीचे पदार्थ आपण ऑर्डर करतो. पण जर कमीत कमी खर्चात पोटभर जेवायचं असेल असं ठरवून रेस्टॉरंटमध्ये जाणार असाल तर काही गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात.
3 / 8
हॉटेलमध्ये हवातसा जेवणाचा आस्वाद घ्यायचा असतो पण वाढत्या बिलामुळे आपण स्वत:ला आवर घालतो. अशावेळी काही ट्रिक्स वापरल्या तर जेवणाचा आस्वादही मनमोकळेपणाने घेऊ शकतो आणि मोठी बचतही करू शकतो.
4 / 8
रेस्टॉरंटमध्ये तुमचं बिल कमी करण्याचा पहिला उपाय म्हणजे प्रथम स्वत:साठी एखादं 'एपेटायझर' ऑर्डर करणं. रेस्टॉरंटमध्ये केवळ 'मेन कोर्स'नंच भरपेट जेवण करता येतं अशी समज सर्वांमध्ये असते. पण एपेटायझरमुळे देखील पोट भरू शकतं आणि मेन कोर्स ऑर्डर करण्याची वेळच तुमच्यावर येणार नाही. मेनकोर्सच्या जवळपास अर्ध्या बिलात तुमचं पोटही भरेल.
5 / 8
बहुतांश रेस्टॉरंटमध्ये त्यांची एक खास रेस्टॉरंट स्पेशल डिश असते. पण ती खूप महागडी डिश असते. रेस्टॉरंटची स्पेशल डिश असल्यानं ती चांगलीच असणार अशा हेतून आपण ती ऑर्डर करतो खरं पण बऱ्याच वेळा हे पदार्थ तितकेसे चांगले नसतात आणि आपला पश्चाताप होतो. त्यामुळे रेस्टॉरंट स्पेशल डिश मागविण्याआधी वेटरकडून संबंधित पदार्थाची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी. त्यानंतरच ऑर्डर द्यावी.
6 / 8
विविध रेस्टॉरंट्समध्ये मार्केटिंगच्या दृष्टीकोनातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही खास ऑफर्सही देण्यात येतात. रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ आणि पेयांवर दिवसातील काही ठराविक वेळेत ऑफर असतात. अशा वेळेला 'हॅपी अवर्स' असं संबोधलं जातं. या ऑफर साधारणत: दुपारी तीन ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत संपतात. त्यामुळे आपण थोडं वेळेचं मॅनेजमेंट केलं की हॅपी अवर्सचा लाभ घेऊन कमीत कमी खर्चात पोटभर जेवण करू शकतो.
7 / 8
सध्या स्मार्टफोनच्या जमान्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध फूड पेमेंट्स अ‍ॅप्स देखील आली आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बुकिंग केलं तर तुम्हाला जेवणाच्या बिलावर काही टक्के सवलत देण्यात येते. यात Dineout, झोमॅटो प्लस, फूड पांडा यांसारखे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यातून बुकिंग केल्यावर १० ते ३० टक्क्यांपर्यंतची सवलत मिळवता येते.
8 / 8
सर्वात महत्वाची बाब म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यावर आलेलं बिल आपण व्यवस्थित तपासून पाहात नाही. रेस्टॉरंटमध्ये तुमच्याकडून सर्व्हिस चार्ज आकारेल असं लिहिलेलं नसेल आणि तरीही तुम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये जेवत असाल तर तुम्ही सर्व्हिस चार्ज भरण्यास नकार देऊ शकता. सेवा शुल्क आणि सेवा कर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
टॅग्स :hotelहॉटेलfoodअन्न