शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताची चिंता वाढवणारा संयुक्त राष्ट्राचा रिपोर्ट; भूजल पातळीबाबत वर्तवलं भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 2:21 PM

1 / 10
दोन वर्षांनी देशात भूजल संकट वाढणार आहे का? खरं तर, संयुक्त राष्ट्रांच्या नवीन अहवालानुसार, भारतातील सिंधू-गंगेच्या मैदानातील काही भागांमध्ये भूजल कमी होण्याची धोकादायक पातळी आधीच ओलांडली आहे. दुसरीकडे, संपूर्ण उत्तर-पश्चिम क्षेत्र २०२५ पर्यंत कमी भूजल पातळी गंभीर संकटाच्या धोक्यात आहे.
2 / 10
'इंटरकनेक्टेड डिझास्टर रिस्क रिपोर्ट २०२३' या अशायाचे संयुक्त राष्ट्र विद्यापीठ-इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायर्नमेंट अँड ह्युमन सिक्युरिटी (UNU- EHS) यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात जगातील ६ महत्त्वाच्या धोक्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
3 / 10
रिपोर्टनुसार, जग आता अशा ६ धोक्यांपर्यंत पोहोचले आहे जे भयंकर आहेत. यात विलोपन प्रक्रिया वेगाने होणे, भूजलाची पातळी कमी, पर्वतीय हिमनद्या विरघळणे, अंतराळातील मलबा, प्रचंड तापमान, अनिश्चित भविष्य या महत्त्वाच्या धोक्यांचा समावेश आहे.
4 / 10
पृथ्वीवरील चक्राच्या सहनशीलतेला मर्यादा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोणतेही मोठे बदल अचानक घडल्यास ते अपरिवर्तनीय असतात, ज्यामुळे नैसर्गिक प्रक्रियेवर, जलवायू पॅटर्न आणि संपूर्ण पर्यावरणावर खोल आणि कधीकधी विनाशकारी परिणाम होतात.
5 / 10
पाणीटंचाईच्या काळात भूगर्भातील सुमारे ७० टक्के पाणी अनेकदा शेतीसाठी उपसले जाते. हे भूगर्भातील पाणी दुष्काळामुळे होणारे शेतीचे नुकसान कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हवामान बदलामुळे हे आव्हान आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
6 / 10
भूगर्भातील पाण्याचे स्रोतच आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. जगातील निम्म्याहून अधिक प्रमुख भूजल स्रोत नैसर्गिकरित्या भरून काढता येण्यापेक्षा वेगाने कमी होत आहेत.
7 / 10
विहिरी ज्या भूजल पातळीतून पाणी येते. जर त्या पाण्याच्या पातळीच्या खाली गेल्यास, शेतकर्‍यांना पाण्याची कमतरता अधिक जाणवू शकते, पाणी सहज उपलब्ध होणं गमवावं लागू शकते, ज्यामुळे संपूर्ण अन्न उत्पादन प्रणाली धोक्यात येऊ शकते.
8 / 10
सौदी अरेबियासारखे काही देश आधीच भूजल टंचाईशी झगडत आहेत. तर भारतासह इतर देशही यापासून दूर नाहीत. भारत हा जगातील सर्वात मोठा भूजल वापरणारा देश आहे. जो अमेरिका आणि चीनच्या एकत्रित वापरापेक्षा जास्त आहे,” असं अहवालात म्हटले आहे.
9 / 10
भारताचा वायव्य प्रदेश हा देशाच्या १.४ अब्ज लोकसंख्येसाठी 'ब्रेड बास्केट' म्हणून काम करतो, पंजाब आणि हरियाणा ही राज्ये देशातील तांदूळ उत्पादनाच्या ५० टक्के आणि गव्हाच्या साठ्यापैकी ८५ टक्के उत्पादन करतात.
10 / 10
“पंजाबमधील ७८ टक्के विहिरींचा भूजलासाठी मोठ्या प्रमाणात अतिवापर करण्यात आला आहे आणि संपूर्ण उत्तर-पश्चिम प्रदेशात २०२५ पर्यंत भूजल साठा अत्यंत कमी होण्याचा अंदाज आहे,” असं अहवालात म्हटले आहे.
टॅग्स :Indiaभारतwater shortageपाणीकपात