कपाळाला कुंकू, दंडवत घालून प्रणाम; अक्षरधाममध्ये भक्तीत तल्लीन झाले ब्रिटिश पंतप्रधान! पाहा PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 14:24 IST
1 / 10ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षतासह आज सकाळी अक्षरधाम मंदिरात पोहोचले. त्यांनी येथे भक्तिभावाने स्वामी नारायण यांचे दर्शन घेते. आज G-20 समिटचा दुसरा दिवस आहे. ही बैठक सुरू होण्यापूर्वी, ते कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मंदिरात पोहोचले होते. त्यांनी येथे विधिवत पूजा केली. यावेळी त्यांनी दंडवत घालून नमस्कार केला. तसेच आरती करून उपस्थितांसोबत फोटोही काढले.2 / 10अक्षरधाम मंदिरात पूजा - ऋषी सुनक सर्वप्रथम अक्षरधाम प्रमुखांच्या मूर्तीजवळ गेले आणि त्यांच्यासंदर्भात माहिती मिळवली. त्यांनी येथे वैदिक मंत्रोच्चारात रक्षा सूत्र बंधले. यानंर मंदिरात जाऊन पूजा केली.3 / 10भक्तिभावात तल्लीन झाले सुनक - ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नीसह सकाळी 6:50 च्या सुमारास अक्षरधाम मंदिरात पोहोचले आणि 7:40 च्या सुमारास मंदिरातून बाहेर पडले. सुनक हे साधारणपणे 50 मिनिटे मंदिर परिसरात होते. या दरम्यान मदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.4 / 10राम दरबारातही गेले - यावेळी सुनक यांनी मंदिरातील सर्वच देवांचे दर्शन घेतले. येथे त्यांना मंदिराचे प्रतीक चिन्हही देण्यात आले. येथे सुनक आणि त्यांच्या पत्नीने मंदिराच्या सर्व प्रोटोकॉलचे पालन केले.5 / 10दंडवत घालून प्रणाम - ऋषी सुनक यांनी दंडवत घालून पूर्ण भक्तीभावाने परमेश्वराचे दर्शन घेतले. यानंतर सुनक म्हणाले, आपल्याला जेव्हा-जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा दर्शनासाठी येणार.6 / 10'हिंदू असण्याचा अभिमान' - 'अपण हिंदू असल्याचा अभिमान आहे,' असे सुनक यांनी अनेक वेळा म्हटले आहे. 7 / 10पावसात दर्शन - ऋषी सुनक जेव्हा मंदिरात पोहोचले तेव्हा पावसाची भूरभूरही सुरू होती. यावेळी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मंदिर परिसर हातात छत्री घेऊन दिसले.8 / 10यावेळी सुनक आणि त्यांच्या पत्नीने मंदिरासंदर्भात माहितीही जाणून घेतली.9 / 10ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीचे अक्षरधाम मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.10 / 10ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीचे अक्षरधाम मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.