नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:16 IST
1 / 8'कधी कोणाचे नशीब बदलेल सांगता येत नाही,' याची प्रचिती संयुक्त अरब अमिराती मध्ये राहणाऱ्या एका भारतीय तरुणाला आली आहे. अनिलकुमार बोल्ला नावाच्या या 29 वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणाने यूएई लॉटरीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा जॅकपॉट जिंकला आहे. 2 / 8अनिलकुमार यांना तब्बल 100 दशलक्ष दिरहम (जवळपास ₹240 कोटी) रुपयांचे बक्षीस लागले आहे. कामगार म्हणून गेलेला अब्जाधीश बनला अशी त्याची अवस्था झाली आहे. 3 / 818 ऑक्टोबर रोजी झालेल्या 23व्या 'लकी डे' ड्रॉमध्ये अनिलकुमार यांनी हा ऐतिहासिक विक्रम केला. अबू धाबीमध्ये राहणारे अनिलकुमार नियमितपणे या लॉटरीत भाग घेत असत. लॉटरीच्या नियमांनुसार, त्यांनी एकट्याने हे तिकीट खरेदी केल्यामुळे, त्यांना ही संपूर्ण 240 कोटींची रक्कम मिळणार आहे, जी यूएई लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठी वैयक्तिक रक्कम आहे.4 / 8जॅकपॉट जिंकल्याची बातमी ऐकून अनिलकुमारला आनंदाचा धक्का बसला. त्यांनी खलीज टाईम्सला सांगितले की, 'मी घरी आराम करत होतो, तेव्हा मला यूएई लॉटरी टीमचा फोन आला. माझ्या कल्पनेपलीकडचा हा विजय आहे. मला अजिबात विश्वास बसत नव्हता, मी त्यांना पुन्हा-पुन्हा सांगायला लावले. यावर अजूनही विश्वास बसत नाहीये!'5 / 8अनिलकुमारने 'इझी पिक' पर्यायाने तिकिटाचे क्रमांक निवडले आणि शेवटचा क्रमांक म्हणून 11 हा खास निवडला, कारण तो त्यांच्या आईचा वाढदिवस आहे.6 / 8एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर अनिलकुमार अतिशय विचारपूर्वक निर्णय घेणार आहेत. 'माझ्याकडे आता पैसा आहे. मला याचा चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे आणि काहीतरी मोठे करायचे आहे,' असे ते म्हणाले. त्यांना सुपरकार विकत घेण्याचे आणि कुटुंबाला यूएईमध्ये स्थलांतरित करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.7 / 8सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'माझ्या आई-वडिलांची स्वप्ने खूप छोटी होती. मला त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करायची आहेत,' असे त्यांनी भावूक होऊन सांगितले. ते या रकमेतील काही भाग दान करण्याचाही विचार करत आहेत.8 / 8यूएई लॉटरीचे कमर्शियल गेमिंग डायरेक्टर, स्कॉट बर्टन यांनी अनिलकुमारचे अभिनंदन करताना सांगितले की, या बक्षीसामुळे केवळ त्यांचे आयुष्यच बदलणार नाही, तर यूएई लॉटरीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.