शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 5:13 PM

1 / 7
श्रीनगरच्या हद्दीबाहेर खोनमोह येथे सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
2 / 7
या दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली.
3 / 7
या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान जखमी झाला असून त्याला ९२ बेस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
4 / 7
दरम्यान, खोनमोह भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी बालहामा येथील घराला घेराव घातला.
5 / 7
चारही बाजूंनी आपण घेरले गेल्याचे लक्षात आल्यानंतर या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला.
6 / 7
मात्र, प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन्ही दहशतवादी ठार झाले.
7 / 7
या दोन्ही दहशतवाद्याकडे शस्त्रसाठा आणि दारुगोळाही सापडला आहे.
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी