शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

दोन दशकांची मैत्री; पीएम मोदी आणि पुतिन यांची पहिली भेट कधी झालेली? पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:42 IST

1 / 5
India-Russia: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर, त्यांची आणि पंतप्रधान मोदींच्या पहिल्या भेटीचे 24 वर्षांपूर्वीचे फोटो पुन्हा समोर आले आहेत. ही भेट त्या काळातील आहे, जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह रशिया दौऱ्यावर गेलेहोते.
2 / 5
फोटोमध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि पुतिन समोर खुर्चीवर बसलेले, तर नरेंद्र मोदी मागे उभे दिसतात. हीच नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यातील पहिली अधिकृत भेट होती. त्या दौऱ्यात तत्कालीन संरक्षण मंत्री जसवंत सिंगदेखील होते.
3 / 5
व्लादिमीर पुतिन तेव्हाही रशियाचे प्रमुख होते आणि आजही आहेत. त्यावेळी झालेल्या मोदी-पुतिन यांच्या पहिल्या भेटीने दोघांमधील मैत्रिची बीजे रोवली आणि आज दोन्ही नेत्यांची मैत्री सर्वश्रृत आहे. विशेष म्हणझे, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यापासून ही मैत्री आणखी वाढली आहे.
4 / 5
नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिली अधिकृत भेट 9 डिसेंबर 2014 रोजी नवी दिल्लीमध्ये झाली होती. त्या भेटीत दोन्ही देशांमध्ये अनेक करार झाले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण झाली.
5 / 5
इतक्या वर्षांमध्ये दोन्ही नेत्यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. आत आज पुतिन भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. तर, उद्या दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे मोदी-पुतिन यांच्यात महत्वाची द्विपक्षीय शिखर बैठक होईल. या बैठकीत संरक्षण, व्यापार आणि सामरिक भागीदारी या प्रमुख विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिनIndiaभारतrussiaरशिया