शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुकाराम मुंढे केवळ 'या' 3 राजकीय नेत्यांनाच ट्विटरवर करतात 'फॉलो'

By महेश गलांडे | Published: February 25, 2021 8:24 PM

1 / 10
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे सोशल मीडियावर चांगलेच एक्टीव्ह असतात, कोरोना कालावधीत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी नागपूरमधील जनतेशी अनेकदा संवाद साधला.
2 / 10
कोरोना कालावधीत नागपूरमध्ये अप्रतिम काम केल्यामुळेच त्यांच्या निरोप समारंभाला अक्षरश: नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आपलं प्रेम व्यक्त केलं.
3 / 10
तुकाराम मुंढेंना जेवढं प्रेम कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांचं मिळतं, तेवढच प्रेम सोशल मीडियावरही मिळते. सोशल मीडियातही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.
4 / 10
त्यामुळेच, सोशल मीडियावरही त्यांची मोठी फॅन फॉलोविंग आहे, तुकाराम मुंढेंच्या अधिकृत फेसबुक पेजला 3 लाख हजार लाईक्स आहेत. तर, त्यांच्या ट्विटर अकाऊंटलाही मोठा फॉलोवर बेस आहे.
5 / 10
सोशल मीडियातील प्रमुख साईट्स म्हणून फेसबुक आणि ट्विटरला प्रधान्यक्रम दिला जातो. तुकाराम मुंढेंच्या फेसबुक पेजला 7 लाख 80 हजार 772 फॉलोअर्स आहेत. तर, ट्विटर हँडलला 1 लाख 8 हजार 300 फॉलोअर्स आहेत.
6 / 10
तुकाराम मुंढें 2014 पासून ट्विटरवर कार्यरत असून सद्यस्थिती ते केवळ 68 जणांना फॉलो करतात. त्यामध्ये, ज्येष्ठ पत्रकारांसह विविध क्षेत्रातील बडे हस्ती आहेत.
7 / 10
मुंढेंच्या ट्विटरचा राजकीय दृष्टीकोनातू अभ्यास केल्यास ते देशातील केवळ तीनच राजकीय व्यक्तींना फोलो करतात. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच एक ट्विटर हँडल आहे.
8 / 10
तर, दुसरे राजकीय व्यक्ती म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी हे असून तिसरे राजकीय नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आहेत. मुंढेंच्या 68 जणांपैकीच्या फॉलोविंग लीस्टमध्ये महाराष्ट्रातील केवळ दोनच राजकीय व्यक्ती आहेत.
9 / 10
याशिवाय बराक ओबामा यांनाही ते ट्विटरवर फोलो करतात, तसेच गायक शंकर महादेवन, अभिनेता अतुल कुलकर्णी यांनाही ते ट्विटरवर फोलो करतात.
10 / 10
उद्योजकापैकी रतन टाटा, आनंद महिंद्रा आणि बिग गेट्स या बड्या उद्योगपतींची नावे त्यांच्या फोलोविंग लीस्टमध्ये आहेत.
टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेSharad Pawarशरद पवारPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणRahul Gandhiराहुल गांधी