1 / 8पंजाबच्या चंदीगडमध्ये एका किन्नरने तेथील प्रसिद्ध साई मंदिरात २६ तोळे हिऱ्यांनी सोन्याचा मुकुट भेट दिला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त किन्नर बंटी महंत यांनी दिलेली ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.2 / 8२६.४ तोळ्यांचे असलेले हे मुकुट जवळपास २० लाख रूपयांचे आहे.3 / 8चंदीगडच्या सेक्टर ३७ येथील स्थानिक ज्वेलर्सने हा मुकुट तयार केला आहे. या मुकुटामध्ये हिरे आणि मोती देखील बसवण्यात आले आहेत.4 / 8खरं तर दरवर्षी शिर्डीला जाऊन साई बाबांची सेवा करण्याचा मानस किन्नर बंटीचा आहे. त्यांनी सांगितले की, यंदा चंदीगडच्या साई मंदिरात सेवा केली आणि ही छोटी भेट दिली. 5 / 8साईबाबांना हा मुकुट अर्पण करण्यापूर्वी मंदिरात सर्वप्रथम मुकुटाची विधिवत पूजा करण्यात आली.6 / 8किन्नर बंटीने सांगितले की, जिथे साई दिसतात तीच शिर्डी आहे. लोकांमध्ये साई रामबद्दल खूप श्रद्धा आहे. चंदीगडमधील या मंदिरात केवळ आसपासचीच लोक येत नसून खूप लांबून भक्त इथे येत असतात. 7 / 8मुकुट साई बाबांच्या मूर्तीला घालण्यापूर्वी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून आणलेल्या गंगाजलने साईंच्या प्रतिमेला जलाभिषेक घालण्यात आला. 8 / 8मुकुट साई बाबांच्या मूर्तीला घालण्यापूर्वी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून आणलेल्या गंगाजलने साईंच्या प्रतिमेला जलाभिषेक घालण्यात आला.