शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भारतात 'या' ठिकाणी पेट्रोल, डिझेलशिवाय चालतात गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 17:39 IST

1 / 5
गाडीमध्ये पेट्रोल, किंवा डिझेल नसले की ती चालवता येत नाही. मात्र भारतात असे एक ठिकाण आहे की जेथे इंधनाविना देखील गाड्या चालतात.
2 / 5
लदाखमधील लेह भागातील एका रहस्यमयी पर्वतांमध्ये जर एख्याद्या व्यक्तीने रात्री गाडी ठेवली असेल तर दूसऱ्या दिवशी सकाळपर्यत पार्क केलेली गाडी त्या ठिकाणावरुन कधाचीत गायब झालेली दिसेल.
3 / 5
लद्दाखच्या लेह पर्वतांचा भाग जादू पेक्षा कमी नाही. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, या पर्वतांमध्ये चुंबकीय शक्ती आहे. ही शक्ती गाड्यांनी 20 किलोमीटर प्रती तासाच्या गतीने स्वतःकडे ओढते. यामुळे याला ‘मॅग्नेटिक हिल’ देखील म्हणतात.
4 / 5
मॅग्नेटिक हिल बरोबरच या जागेला ‘ग्रॅविटी हिल’ म्हणून देखील ओळखले जाते. या पर्वतांवर गुरूत्वाकर्षणाचा नियम काम करत नाही. गुरूत्वाकर्षणाच्या नियमानुसार, कोणत्याही वस्तूला उतारावरून खाली सोडून दिले तर ती वस्तू खाली गरंगळते. मात्र या पर्वतांवर तसे होत नाही. एखाद्या पातळ पदार्थाला खाली टाकले तरी ते खालच्या बाजूला न जाता वरच्या दिशेने वाहते.
5 / 5
विमान घेऊन गेलेल्या अनेक पायलट्सचा दावा आहे की, या पर्वतांवरून जाताना अनेक झटके बसतात. पर्वतांच्या चुंबकीय शक्तीपासून वाचण्यासाठी विमानाचा वेग वाढवावा लागतो.
टॅग्स :ladakhलडाखIndiaभारत