शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील 'या' कंपन्या आपल्या कर्मचारी आणि कुटुंबीयांना देणार मोफत करोनाची लस!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 5:49 PM

1 / 8
भारतातील काही दिग्गज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत कर्मचाऱ्यांना मोफत कोरोनाची लस देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
2 / 8
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज 'इन्फोसिस लिमिटेड' ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत कोरोनाची लस देणार आहे.
3 / 8
इन्फोसिससोबतच कन्सल्टिंग आणि आऊटसोर्सिंग सर्विसेज प्रोव्हायडर अॅक्सेंचर कंपनीनंही (Accenture) आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे.
4 / 8
रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार इन्फोसिस आरोग्य सेवा देणाऱ्यासोबतच कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या लसीकरणावर विचार करत आहेत. इन्फोसिसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रविण राव यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
5 / 8
इन्फोसिस आणि अॅक्सेंचरसोबतच आणखी काही कंपन्यांनी कोरोना लस खरेदी करण्याची तयारी देखील सुरू केली आहे. यात महिंद्रा ग्रूप आणि आयटीसी सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
6 / 8
भारतात सध्या कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात वयाच्या ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. तर सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांच्या वरील व्यक्तींनाही लस घेता येत आहे.
7 / 8
देशात सध्या १० हजार सरकारी केंद्रांवर मोफत कोरोना लशीचा डोस मिळत आहे. तर खासगी केंद्रांवर २५० रुपयांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
8 / 8
आगामी काळात देशातील आणखी काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यासाठी पुढाकार घेताना दिसतील, असं सांगितलं जात आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसInfosysइन्फोसिसMahindraमहिंद्राcorona virusकोरोना वायरस बातम्या