शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मैत्रीत दुरावा नाही! US निर्बंधानंतरही रशियाकडून भारताला मिळणार 'ब्रह्मास्त्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 5:48 PM

1 / 8
भारताला लवकरच रशियाकडून 'ब्रह्मास्त्र' मिळणार आहे. अमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानता रशियामध्ये बनवलेल्या युद्धनौका भारतीय नौदलात सामील होण्यास सज्ज आहेत. यावरून दोन्ही देशांच्या मैत्रीत कोणतीही दुरावा नसल्याचं अधोरेखित झालं आहे.
2 / 8
भारत दीर्घ काळापासून शस्त्रास्त्रांसाठी रशियावर अवलंबून आहे. या दोन युद्धनौका भारताने २०१८ मध्ये रशियासोबत केलेल्या चार जहाजांच्या कराराचा एक भाग आहेत. यातील दोन जहाजे लवकरच भारताला दिली जाणार आहेत, तर दोन जहाजे रशियाच्या मदतीने भारतातच तयार होत आहेत. युक्रेन युद्धामुळे या युद्धनौका २ वर्ष उशिराने भारताला मिळत आहेत.
3 / 8
रिपोर्टनुसार, भारत पुढील काही महिन्यांत रशियन बनावटीच्या दोन युद्धनौका भारतात दाखल होतील. खरं तर, दोन्ही देश अमेरिकेच्या निर्बंधांवर काम करत आहेत, ज्यामुळे रशियन शस्त्रास्त्र प्रणालींसाठी पैसे देणे कठीण झाले आहे.
4 / 8
एक जहाज सप्टेंबरमध्ये भारतीय नौदलाकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे, तर दुसरे जहाज पुढील वर्षीच्या सुरुवातीला सुपूर्द केले जाईल. युक्रेनमधील युद्धामुळे जहाजांची डिलिव्हरी नियोजित वेळेपेक्षा दोन वर्षे उशिरा आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले. या दोन्ही युद्धनौका भारताने २०१८ मध्ये रशियासोबत करार केला होता.
5 / 8
भारत रशियाला शस्त्रास्त्रांसाठी भारतीय चलन रुपये देत आहे. तर कच्च्या तेलासाठी UAE चं दिरहम आणि अमेरिकन डॉलर यांसारख्या संयुक्त चलनांचा वापर करते. भारत हा रशियन सागरी तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. भारतात अब्जावधी डॉलर्सची देणी जमा झाल्यामुळे ही यंत्रणा काही काळ अडचणीत आली होती.
6 / 8
अमेरिकेनं भारतावर रशियासोबतचे व्यवहारावर दंड आकारणं बऱ्याच प्रमाणात टाळलं आहे. ज्यात एडवान्स एअर डिफेन्स सिस्टम दंडाचाही समावेश आहे. कारण चीनसोबतच्या तीव्र स्पर्धेत अमेरिका भारताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते.
7 / 8
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि फ्रान्सकडून अधिक शस्त्रे खरेदी करण्याचा आणि देशात लष्करी हार्डवेअर तयार करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आक्रमक कार्यक्रम असूनही, रशिया हा लष्करी हार्डवेअरचा भारतातील सर्वात मोठा पुरवठादार आहे.
8 / 8
भारताच्या शस्त्रास्त्रांच्या आयातीपैकी हे प्रमाण ३६ टक्के आहे. मागील सहा दशकांतील ही पहिलीच वेळ आहे की भारताच्या शस्त्रास्त्र आयातीपैकी निम्म्याहून कमी आयात रशियाची आहे असं जागतिक शस्त्रास्त्र व्यापाराचा अभ्यास करणाऱ्या SIPRI या स्वतंत्र थिंक टँकने आपल्या अलीकडील अहवालात म्हटले आहे.
टॅग्स :IndiaभारतrussiaरशियाAmericaअमेरिका