महिला वर्गाचा कल नोकरी सोडण्याकडे? काय आहे यामागचं कारण अन् सर्व्हेक्षणात काय हाती लागलं पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 08:39 IST
1 / 7भारतीय नोकरदार महिला वर्गाचा कल नोकरी सोडण्याकडे असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामागे अनेक कारणे असली तरी कामाच्या वेळेत असलेला लवचीकतेचा अभाव, हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. 2 / 7८३ टक्के महिलांना कोरोना महासाथीमध्ये आपण अधिक लवचीकपणे काम करू शकतो असे आढळले. 3 / 7टाळेबंदीचा काळ संपल्यानंतर पुन्हा ऑफिसात जाऊन काम करताना कामाच्या वेळा लवचीक असाव्यात, असे या नोकरदार महिलांना प्रकर्षाने जाणवू लागले. 4 / 7७२ टक्के नोकरदार महिला स्वातंत्र्य कामाच्या ठिकाणी मिळत नसल्याने अशा नोकऱ्यांच्या प्रस्तावाचा स्वीकारच करण्यास तयार नाहीत. 5 / 7७० टक्के महिलांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे किंवा त्या मन:स्थितीत आहेत, असे या सर्वेक्षणात आढळून आले. 6 / 7कामातील लवचीकपणामुळे कार्यालय त्यांचे काम व वैयक्तिक जीवन यांच्यात समतोल अधिक चांगल्या पद्धतीने साधला जात असल्याचे नोकरदार महिलांचे निरीक्षण आहे.7 / 7चांगली कामगिरी नोंदविणाऱ्या संस्थांना आपल्याकडील प्रतिभावान कर्मचाऱ्यांना टिकवून ठेवायचे असेल तर त्यांना लवचीक धोरणांचा स्वीकार करावा लागेल. अन्यथा देशात महिला नोकरदारांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.