शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:50 IST

1 / 9
भारतीय नौदल त्यांचे दुसरे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASW-SWC), अँड्रोथ आज विशाखापट्टणम नौदल डॉकयार्ड येथे सेवेत दाखल करणार आहे. अँड्रोथचा नौदलात समावेश क्षमता वाढ आणि स्वदेशीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
2 / 9
कोलकातास्थित गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सद्वारे याची निर्मिती केली आहे, अँड्रोथमध्ये ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री आहे. यावरुन आता भारत समुद्री आत्मनिर्भर झाल्याचे दिसत आहे.
3 / 9
या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. पाण्याखाली शत्रूच्या पाणबुड्या नष्ट करण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे.
4 / 9
संरक्षण मंत्रालयाच्या मते, आयएनएस अँड्रोथच्या कमिशनिंगमुळे नौदलाची पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता बळकट होईल. किनारी किंवा उथळ पाण्याच्या क्षेत्रात पाणबुडी धोक्यांचा सामना करण्यासाठी ही युद्धनौका महत्त्वाची आहे.
5 / 9
अर्नाळा, निस्तार, उदयगिरी, निलगिरी आणि आता आयएनएस अँड्रोथ यासारख्या कमिशन केलेल्या युद्धनौका भारतीय नौदलाच्या वाढत्या क्षमता प्रदर्शित करतात.
6 / 9
पाणबुडीविरोधी युद्धनौका शॅलो वॉटर क्राफ्ट मालिकेतील हे दुसरे जहाज आहे. पूर्व नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल राजेश पेंढारकर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
7 / 9
या जहाजाचे नाव लक्षद्वीपमधील अँड्रोथ बेटावरून ठेवण्यात आले आहे. पूर्वी नौदलाकडे आयएनएस अँड्रोथ (P69) नावाचे जहाज होते, त्या जहाजाने २७ वर्षे देशाची सेवा केली. नवीन अँड्रोथ ती परंपरा पुढे घेऊन जाणार आहे.
8 / 9
हे जहाज आधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे. ते शत्रूच्या पाणबुड्या शोधू शकते आणि नष्ट करू शकते. ते सागरी देखरेख, किनारी सुरक्षा आणि शोध आणि बचाव कार्ये यासारखी कामे देखील करेल.
9 / 9
अँड्रोथच्या आगमनामुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढेल. ते देशाच्या सागरी सीमा आणखी मजबूत करेल आणि हे दाखवून देईल की भारत आता स्वतःच्या युद्धनौका बांधण्यास सक्षम आहे.
टॅग्स :indian navyभारतीय नौदल