शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतामधील आगळावेगळा विमानतळ, आतापर्यंत इथून उडालेलं नाही एकही विमान, तरीही असते गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:13 IST

1 / 5
काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ श्रीमंतांच्या प्रवासाचं साधन असलेला विमान प्रवास आता भारतात बऱ्यापैकी किफायतशीर झाला आहे. त्यामुळे या विमानांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे देशातील मुंबई, दिल्ली येथील मोठ्या विमानतळांबरोबरच छोट्या छोट्या शहरांमधील विमानतळांवरही प्रवाशांची गर्दी दिसून येते. मात्र भारतामध्ये असाही एक विमानतळ आहे जिथून अद्याप एकाही विमानानं उड्डाण केलेलं नाही.
2 / 5
या विमानतळावर दररोज शेकडो लोक येतात. मात्र इथून कुठलंही विमान उड्डाण करत नाही. हा आगळावेगळा विमानतळ हैदराबादमध्ये आहे. तसेच हा काही खराखुरा विमानतळ नाही आहे, तर चित्रपटांचं चित्रिकरण करण्यासाठी तयार केलेला विमानतळ आहे. हा विमानतळ हैदराबादमधील रामोजी फिल्मीसिटीमध्ये आहे.
3 / 5
रामोजी फिल्म सिटीची जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी अशी ओळख आहे. याच फिल्म सिटीमध्ये विमानतलाचा एक सेट तयार केलेला आहे. तसेच या विमानतळाच्या सेटचा वापर दक्षिणेमधील अनेक चित्रपटांसह बॉलीवूडच्या चित्रपटांमध्येही करण्यात येत असतो. दक्षिणेतील बहुतांश चित्रपटांमध्ये तुम्हाला हा विमानतळ दिसतो. चित्रिकरण करताना ज्या विमानतळाचं नाव द्यायचं असेल ते नाव या सेटवर झळकवले जाते.
4 / 5
तसेच रामोजी फिल्म सिटीमधील या विमानतळाच्या सेटवर एका विमानाचाही सेट तयार केलेला आहे. तुम्ही जेव्हा विमानतळाच्या आत प्रवेश करता तेव्हा तुम्हाला इथे एक विमान दिसेल. या विमानामध्ये खऱ्याखुऱ्या विमानासारख्या सिट्स बसवलेल्या आहेत. अनेक चित्रपटांमधील विमानाच्या आतील सीन हे इथेच चित्रित केले जातात.
5 / 5
हैदराबाद येथे पोहोचल्यानंतर तुम्ही बस किंवा ऑटोच्या माध्यमातून या फिल्मसिटीमध्ये पोहोचू शकता. त्यानंतर तिकीट काढून तुम्ही ही फिल्मसिटी पाहू शकता. मुलं आणि विद्यार्थ्यांसाठी वेगळी फी आहे. कॅमेरा घेऊन जाण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावं लागतं.
टॅग्स :AirportविमानतळJara hatkeजरा हटकेcinemaसिनेमा