अशी कशी ही आघाडी ! 'INDIA' आघाडीत २८ पक्ष, पैकी ७ काँग्रेस फोडून बनलेले, ७ एनडीएसोबत होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 14:20 IST
1 / 7लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली आहे, त्याची कवायत सुरु आहे. यासाठी आज मुंबईत बैठक होत आहे. यामध्ये काँग्रेस मुख्य पक्ष असला तरी इतर त्या त्या राज्यात चांगला दबदबा असलेले पक्ष आहेत. भाजपासोबत देखील असेच छोटे-मोठे पक्ष आहेत. यामुळे ही लोकसभा निवडणूक चुरशीची असणार आहे. 2 / 7इंडिया आघाडीमध्ये २८ पक्ष एकत्र आले आहेत. दोन दिवस या पक्षांची बैठक असणार आहे. यामध्ये संयोजक कोण, आघाडीचा लोगो कोणता असेल याची माहिती मिळणार आहे. बंगळुरूच्या बैठकीत आघाडीला 'INDIA' नाव देण्यात आले होते. 3 / 7महत्वाची बाब म्हणजे या आघाडीमध्ये जे सात पक्ष आहेत, ते काँग्रेस फुटूनच बनलेले आहेत. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे सात पक्ष हे कधीकाळी भाजपासोबत एनडीएमध्ये होते. या सातमधील काही पक्ष दोन्ही बाजुने होते. या सर्व पक्षांची ही तिसरी बैठक आहे. पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडियासोबतच आणखी एक प्रादेशिक पक्षही या बैठकीत सहभागी होणार आहे. 4 / 7आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस, TMC, शिवसेना (उद्धव गट), NCP (शरद पवार गट), CPI, CPIM, JDU, DMK, आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, RJD, समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, PDP, यांचा समावेश आहे. 5 / 7तसेच छोट्या पक्षांमध्ये RLD, CPI (ML), इंडियन युनियन मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस (M), मनिथनेय मक्कल काची (MMK), MDMK, VCK, RSP, केरळ काँग्रेस, KMDK, AIFB, अपना दल कामेरवाडी आणि शेतकरी आणि कामगार पक्ष यांचा समावेश आहे. 6 / 7काँग्रेसमधून पक्ष फोडून तयार झालेल्या पक्षांमध्ये केरल कांग्रेस और केरल कांग्रेस (M), टीएमसी, एनसीपी, पीडीपी, रालोद, एआईएफबी या पक्षांचा समावेश आहे. 7 / 7तर कधीकाळी भाजपासोबत असलेल्या पक्षांमध्ये शिवसेना (उद्धव गट), पीडीपी, जदयू, टीएमसी, रालोद, केएमडीके हे पक्ष आहेत. ममता यांचा टीएमसी 1999 मध्ये भाजपात होता. त्यांचा रेल्वे मंत्री देखील होता. २००१ मध्ये हा पक्ष युपीएत आला.