By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 12:35 IST
1 / 6बिहारमधील बाका जिल्ह्यातील रजौर पोलीस स्टेशन परिसरातील चंगेरी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची केस केली होती. मात्र दुसरीकडे मुलीच्या फोटोंनी सर्वांनाच चकित केले. संबंधित मुलगी पुंसिया बाजार येथील रहिवासी आहे, तिचा प्रियकर हा जवळच्या परिसरातील चांगेरी गावचा रहिवासी आहे. 2 / 6खरं तर मुलीचे वडील सुबोध कुमार यांनी चंगेरी येथील राजा कुमार या तरूणाने आपली मुलगी रियाचे अपहरण केल्याप्रकरणी राजौन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आणि खळबळ माजली. 3 / 6प्रेयसी आणि प्रियकर यांनी एकत्र शिक्षण घेतले असल्याचे सांगितले जात आहे. दोघांमध्ये मागील मोठ्या कालावधीपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते मात्र त्यासाठी घरच्यांचा विरोध होता. हा प्रेमविवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. 4 / 6या प्रेमी युगुलाने लग्नानंतरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे सुमारे 2 महिन्यांपूर्वी या मुलाच्या लहान भावाने पुंसिया बाजार येथील एका मुलीशी लग्न केले होते.5 / 6संबंधित मुलीचे वडील सुबोध कुमार यांच्या माहितीनुसार, त्यांची 18 वर्षीय मुलगी रिया कुमारी मागील शुक्रवारी घरातील वस्तू घेण्यासाठी पुनसिया बाजारात गेली होती, मात्र रात्री उशिरापर्यंत ती परत आली नाही.6 / 6खरं तर18 वर्षीय रिया कुमार मार्केटमध्ये गेली आणि परतलीच नाही. यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसांत अपहरणाची केस दाखल केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलीचे लग्न झाल्याचे फोटो समोर आल्याने एकच खळबळ माजली.