यासिन मलिक खातोय तुरुंगाची हवा, त्याच्या बायकोची पाकिस्तानात एवढी चर्चा का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 11:06 IST
1 / 7काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक भारताच्या तुरुंगात बंद आहे. परंतू, त्याची पत्नी मुशाल हुसैन मलिक पाकिस्तानात चर्चेत आली आहे.2 / 7मुशाल हुसैन मलिक हिची पाकिस्तानमधील मानवाधिकारांवर पंतप्रधानांची विशेष सहाय्यक (SAPM) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 3 / 7मुशालचा जन्म 1986 मध्ये कराची, पाकिस्तानमध्ये झाला होता. मुशालने इस्लामाबादमधील बीकनहाऊस या प्रसिद्ध शाळेतून शिक्षण घेतले आहे.4 / 7मुशाल हुसैन मलिकने 2009 मध्ये फुटीरतावादी नेता आणि दहशतवादी यासिन मलिकसोबत लग्न केले होते. 5 / 7मुशाल मलिक तिच्या चित्रकलेच्या आवडीसाठी प्रसिद्ध आहे.6 / 7मुशालचे वडील हुसेन मलिक हे अर्थतज्ज्ञ होते. ते कायदे-ए-आझम मोहम्मद अली जिना विद्यापीठ, इस्लामाबाद येथे प्राध्यापक राहिले आहेत.7 / 7मुशाल हुसैन मलिक काश्मीर वाद आणि तिचा पती यासीन मलिक यांच्याबद्दल बोलत असते.