Sunstrock: कडक उन्हामुळे कलिंगडची मागणी वाढली, लिंबाचेही दर वधारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 09:43 IST
1 / 10देशात काही दिवसांपासून सुरु असलेली उष्णतेची लाट कायमच असून, सूर्य प्रखरतेने तळपत असल्याने मंगळवारी जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात करण्यात आली. 2 / 10भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सियस कमाल तापमानासह मंगळवारी अकोला जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले. 3 / 10नायझर देशातील बिर्नी एन कोन्नी (४४ अंश सेल्सियस) दुसरे सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे. टॉप पाच शहरांमध्ये पाकिस्तानमधील नवाबशाह व नायझर देशातील एनगुल्ग्मी व टिलाबेरी या शहरांचा समावेश आहे.4 / 10मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून सुरू असलेली उष्णतेची लाट एप्रिल महिन्यात आणखीन तीव्र झाली आहे. गत आठवडाभरापासून अकोला शहराचे तापमान ४३ अंशांच्या वरच राहिले आहे. 5 / 10अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तप्त झळा असह्य होत असल्याने नागरिक घरातच राहणे पसंत करत आहेत. तर, कोल्ड्रींक्स, आणि उन्हाळी फळांचा जोर वाढला आहे.6 / 10कलिंगडची मागणी वाढली असून थंडगार कलिंगड खाण्यासाठी नागरिक उत्सुक दिसून येतात. त्यासोबतच द्रांक्षेही बाजारात तेजीत दिसत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सिझनमध्ये हा आस्वाद नागरिक घेत आहेत. 7 / 10दुसरीकडे शीतपेय आणि विविध कोल्ड्रींक्सचाही खप वाढला आहे. पारंपरिक लिंबू शरबतचे स्टॉलही जागोजागी दिसून येत आहेत.8 / 10नेहमीप्रमाणे उन्हाळ्यात लिंबाचे भाव वधारले असून सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचाही परिणाम लिंबांच्या भावावर झाला आहे. 9 / 10गतवर्षी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे लिंबांच्या बागेचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे, यंदा लिंबांची चांगलीच दरवाढ पाहायला मिळत आहे. 10 / 10गुजरातच्या सुरत मार्केटमध्ये लिंबू 200 ते 250 रुपये किलोने विकले जात आहेत. मुंबईतही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे