शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

नोरा फतेहीने कारसाठी तगादा लावला होता, घरासाठीही पैसे...; सुकेश चंद्रशेखरचा नवा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 15:39 IST

1 / 8
200 कोटींच्या खंडणी प्रकरणी अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर रोज एक नवा खुलासा करत आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिसने मोठे खुलासे केले होते.
2 / 8
नोरा म्हणाली होती की, सुकेशने एक अट ठेवली होती की जर ती त्याची गर्लफ्रेंड झाली तर तिला आरामात आयुष्य जगता येईल.यानंतर आता सुकेशने मोठा दावा केला आहे.
3 / 8
सुकेशने मोरोक्कोमध्ये नोराच्यासाठी घरासाठी पैसे दिले असल्याचे म्हटले आहे. नोराने 215 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी तिचा जबाब नोंदवला आहे. यापूर्वी सुकेशने म्हटले आहे की, नोराला जॅकलिनचा हेवा वाटत होता आणि सुकेशने तिला आपली मैत्रीण बनवावे अशी त्याची इच्छा होती.
4 / 8
या प्रकरणी आता सुकेश चंद्रशेखर याने नवा दावा केला आहे. 'आज ती म्हणत आहे की मी तिला मोठ्या घराचे वचन दिले होते, परंतु तिने आधीच तिच्या कुटुंबासाठी घर घेण्यासाठी माझ्याकडून मोठी रक्कम घेतली आहे. कायद्यापासून वाचण्यासाठी त्यांनी या सर्व कथा रचल्या आहेत, असा दावा सुकेशने केला आहे.
5 / 8
'नोराचा दावा खोटा तिला कार नको होती किंवा तिने ती स्वतः खरेदी केली होती, तिने मला कार हवी आहे असं म्हटले होते. नोरासोबत एक कार पसंद केली होती असा दावा सुकेशने केला आहे.
6 / 8
'मला नोराला रेंज रोव्हर द्यायची होती पण कार मिळाली नाही, पण, तिला घाई होती म्हणून मी तिला बीएमडब्ल्यू सीरिज गिफ्ट केली. तिने ती बरीच वापरली. नोरा भारतीय नाही म्हणून तिने कार तिच्या बेस्ट फ्रेंडच्या पतीच्या नावावर रजिस्टर करून घेतली, असंही सुकेशने म्हटले आहे.
7 / 8
नोरा आणि माझा कोणताही व्यावसायिक व्यवहार नाही कारण ती दावा करत आहे. फक्त एकदा, नोरा फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती, ज्याचे पैसे तिच्या एजन्सीने दिले होते, असंही सुकेसने म्हटले आहे.
8 / 8
सुकेश आणि जॅकलिन फर्नांडिस गंभीर नात्यात असल्याचा दावाही सुकेशने केला आहे, याचा नोराला हेवा वाटला, असा दावा चंद्रशेखर सुकेशने केला आहे.
टॅग्स :Nora fatehiनोरा फतेहीbollywoodबॉलिवूड