शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:00 IST

1 / 10
यश हे कठोर परिश्रम, संयम आणि अतूट विश्वासातून मिळतं. सिद्धार्थ सक्सेनाची गोष्टही अशीच प्रेरणादायी आहे. मुलाने अधिकारी व्हावं असं सिद्धार्थच्या वडिलांचं स्वप्न होतं. सिद्धार्थनेही ते ध्येय मनाशी पक्कं केले होते, पण हा प्रवास सोपा नव्हता.
2 / 10
सिद्धार्थने १० परीक्षा दिल्या, पण प्रत्येक वेळी पदरी अपयश आलं. अडचणी वाढतच गेल्या आणि अभ्यासासाठी पैसे उभं करणं कठीण झालं, तेव्हा त्याच्या आईने स्वतःचे दागिने विकले.
3 / 10
अखेर सर्व संकटांवर मात करत सिद्धार्थने UPSC CAPF परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया रँक (AIR) ३२६ मिळवून तो 'असिस्टेंट कमांडंट' बनला. ही यशोगाथा सिद्धार्थचा दृढनिश्चय आणि त्याच्या वडिलांनी पाहिलेल्या त्या सुंदर स्वप्नाबद्दल सांगते.
4 / 10
एका मुलाखतीत सिद्धार्थने सांगितलं की, तो उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील बिसलपूर या छोट्या शहराचा रहिवासी आहे. त्याच्या आयुष्याला वडिलांनी आकार दिला होता, जे एका सहकारी संस्थेत अकाउंटंट होते. त्याचे वडील त्याला नेहमीच प्रेरणा देत असत.
5 / 10
सिद्धार्थने बिसलपूरच्या सरस्वती विद्या मंदिर इंटर कॉलेजमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर फिजिक्स BSc (ऑनर्स) करण्यासाठी तो दिल्ली विद्यापीठात पोहोचला.
6 / 10
नागरी सेवा परीक्षेची तयारी डोळ्यांसमोर ठेवून त्याने इतिहास विषयात मास्टर डिग्री मिळवली आणि नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) उत्तीर्ण केली. त्याने प्राथमिक शिक्षणातील डिप्लोमा देखील पूर्ण केला.
7 / 10
२०२२ मध्ये लिव्हर फेल्युअरमुळे त्याच्या वडिलांचं निधन झालं. हा त्याच्यासाठी मोठा धक्का होता. उपचारासाठी खूप पैसा खर्च झाल्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवलं आणि सिद्धार्थच्या तयारीमध्ये अडथळे येऊ लागले.
8 / 10
वडिलांच्या निधनानंतरही आईने सिद्धार्थचा आत्मविश्वास डगमगू दिला नाही. शिक्षणासाठी पैशांची कमतरता भासली, तेव्हा तिने स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि काही विकले.
9 / 10
सिद्धार्थने एका वर्षात १० परीक्षा दिल्या, पण यश मिळालं नाही. वारंवार अपयश येऊनही त्याने जिद्द सोडली नाही. हार न मानता सिद्धार्थने २०२३ मध्ये IAS आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची (UPPSC) प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण केली, पण अंतिम यादीत त्याचे नाव आलं नाही.
10 / 10
CAPF परीक्षेचीही तयारी केली होती आणि ती एक बॅकअप म्हणून ठेवली होती. अखेर UPSC CAPF २०२४ मध्ये त्याने ३२६ वी रँक मिळवून असिस्टेंट कमांडंट पदाला गवसणी घातली. त्याच्यापासून आता अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी