शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलेंडर महागल्याने पुन्हा पेटल्या चुली, महिलांच्या डोळ्यात धुराचे अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 11:01 IST

1 / 10
देशातील 4 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यातील नागरिकांचे प्रश्न आणि अडचणी समोर येत आहेत.
2 / 10
आसाममधील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांनीही आपली व्यथा मांध्यमांसमोर मांडली आहे. कोरोनामुळे हाताला दररोज काम नाही, काम मिळाले तरी पुरेपूर वेतन मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
3 / 10
सरकाराने सांगितलं होतं की, तुम्हाला 300 रुपये रोजगार मिळेल, पण अद्यापही 170 रुपयेच मिळतात. त्यामुळे, इच्छा असूनही गॅल सिलेंडर वाढलेल्या दरामुळे घेता येता नाही. त्यामुळेच, पुन्हा चुली पेटवण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचं सीमा यांनी सांगितलं.
4 / 10
जोरहत येथील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची हौस नाही, धुरापासून मुक्ती मिळाल्याचा आनंद झाला होता. पण, दरवाढीवाढीमुळे आमचा नाईलाज झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
5 / 10
उज्ज्वला योजनेतून सरकारने एलपीजी गॅस आणि सिलेंडर मोफत दिलं, पण सिलेंडर भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे, पुन्हा चूल पेटविण्याची वेळ येथील गरिब महिलांवर आली आहे
6 / 10
ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांची धुरापासून मुक्तता करण्यासाठी मोदी सरकारने जिल्ह्यातील महिलांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलेंडर मोफत दिले. नंतरची रिफिलिंग मात्र संबंधित लाभार्थ्याला करायची होती.
7 / 10
आता गॅस सिलेंडरची किंमत आठशे रुपयांपेक्षाही जास्त झाल्याने गोरगरीब महिला पुन्हा चुलीकडे वळाल्या आहेत. महागाई पेक्षा धूर परवडला, अशाच संतप्त भावना महिलांनी व्यक्त केल्या.
8 / 10
स्वयंपाक करण्यासाठी स्वच्छ इंधनाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने १ मे २०१६ पासून हानिकारक रॉकेल, धूर विरहित लाकूड इंधन, गोवऱ्या इत्यादींमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून मुक्ती देण्यासाठी, महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना सुरू केली होती.
9 / 10
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गॅस सिलिंडर, रेग्युलेटरसह वाटप करण्यात आले होते. मात्र, या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या मजूर कुटुंबांना त्याच्या वाढत्या किमती परवडत नसल्याने गॅस सिलेंडर अडगळीत टाकावे लागले आणि पुन्हा चुली पेटवाव्या लागल्या आहेत.
10 / 10
आसाममधील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या अनेक महिलांच्या घरात हीच परिस्थिती दिसते आहे. एकीकडे रॉकेल बंद झाले आहे, तर दुसरीकडे गॅस महाग झाल्याने ग्रामीण भागातील महिलांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे चूल पेटविण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
टॅग्स :ElectionनिवडणूकGovernmentसरकारPetrolपेट्रोलAssamआसाम