आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 01:36 IST
1 / 5बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, याच दरम्यान, एक हिंसक घटना घडली. हम जीतन राम मांझी यांच्या हम पक्षाचे विद्यमान आमदार आणि उमेदवार अनिल कुमार यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. 2 / 5गया जिल्ह्यात बुधवारी सांयकाळी प्रचार दौरा करत असताना ही घटना घडली. या घटनेत आमदार अनिल कुमार, त्यांचे भाऊ आणि इतर काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. वाहनांचेही नुकसान झाले आहे. 3 / 5आमदार अनिल कुमार यांचा ताफा जसा दिघोरा गावात पोहोचला, तसा ग्रामस्थांनी गावात येण्यासाठी चांगला रस्ता का तयार केला नाही, म्हणत धारेवर धरले. वाद-विवाद वाढला आणि काही लोकांनी थेट दगडफेक सुरू केली. त्यामुळे गोंधळ उडाला. सुरक्षा जवानांनी हवेत गोळीबार करत हल्लेखोरांना पांगवले.4 / 5घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शशांक शुभंकर, पोलीस अधीक्षक आनंद कुमार आणि इतर अधिकारी गावात आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ९ लोकांना अटक केली. 5 / 5जिल्हाधिकारी शशांक शुभंकर यांनी सांगितले की, घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. यात आमदार तथा उमेदवार अनिल कुमार यांचाही समावेश आहे. पोलीस सध्या आणखी आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर सर्वच उमेदवारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.